
शारीरिक स्वच्छता आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. नवीन तंत्रज्ञानानुसार या बाबतीतही विकासाची गती प्राप्त झाली. मुख्यत्वेकरून महिला, बालके व रुग्ण यांच्या शारीरिक स्वच्छतेकरिता नवीन तंत्रज्ञानाने सॅनिटरी नॅपकीन व पॅम्पर्स यांचा वापर करण्याकरिता शासनस्तरावरही प्रचारप्रसार सुरू आहे. शारीरिक स्वच्छतेच्या व सुलभतेच्यादृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे; परंतु या साधनांचा वापर झाल्यावर त्यांच्या विघटनाबाबत कोणतीही सूचना किंवा प्रचारप्रसार झालेला नाही. यामुळे उद्भवलेल्या अनेक समस्या आहेत. त्या कोणत्या आणि त्यावर उपाय काय ते पाहूया.
- प्रशांत परांजपे, दापोली