esakal | कामानिमित्त गोव्याला गेला, घरी परततानाच...

बोलून बातमी शोधा

major accident in satose (sawantwadi)

मालपे (ता. पेडणे) येथील उतारावर कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने सातोसे (ता. सावंतवाडी) येथील रोहन ऊर्फ मुन्ना संदिप गवंडी (वय 22, रा. सातोसे-आडारीवाडी) हा युवक ठार झाला. रुग्णवाहिकेतून ऍजिलो-म्हापसा येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधानपणा दाखवला, पण काळापुढे त्याचे प्रयत्न असफल ठरले. हा अपघात काल (ता.6) रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास घडला. बांबोळी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर आज दुपारी शोकाकुल वातावरणात रोहनवर सातोसे येथे अंत्यसंस्कार झाले. पेडणे पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली. 

कामानिमित्त गोव्याला गेला, घरी परततानाच...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) -  मालपे (ता. पेडणे) येथील उतारावर कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने सातोसे (ता. सावंतवाडी) येथील रोहन ऊर्फ मुन्ना संदिप गवंडी (वय 22, रा. सातोसे-आडारीवाडी) हा युवक ठार झाला. रुग्णवाहिकेतून ऍजिलो-म्हापसा येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधानपणा दाखवला, पण काळापुढे त्याचे प्रयत्न असफल ठरले. हा अपघात काल (ता.6) रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास घडला. बांबोळी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर आज दुपारी शोकाकुल वातावरणात रोहनवर सातोसे येथे अंत्यसंस्कार झाले. पेडणे पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, रोहन हा गोव्यात खासगी कंपनीत नोकरीला होता. वैयक्तिक कामासाठी तो काल गोव्यात गेला होता. रात्री घरी परतत असताना मालपे येथील उतारावर त्याच्या दुचाकीला कंटेनरची धडक बसली. यात त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. म्हापसा येथे रूग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. 
रोहन हा शांत व कष्टाळू युवक म्हणून परिसरात परिचित होता. सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात त्याचा कायम सहभाग असायचा. गुणी क्रिकेटपटू म्हणूनही त्याची ओळख होती. त्याच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, काका-काकी असा परिवार आहे. 

प्रसंगावधान दाखवले पण... 
अपघातानंतर अर्धा तास रोहन जखमी अवस्थेत त्याच ठिकाणी विव्हळत पडला होता. त्याचवेळी सावंतवाडी येथून एका अत्यवस्थ रुग्णाला गोवा-बांबुळी रुग्णालयात नेणारा रुग्णवाहिका चालक हेमंत वागळे याने प्रसंगावधान दाखवत रुग्णवाहिका थांबविली. जखमी रोहनला रुग्णवाहिकेत घेतले व म्हापसा येथील ऍजिलो रुग्णालयात दाखल केले; मात्र त्याच्या डोक्‍याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे अतिरक्तस्त्रावाने त्याचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.