

Road Accident
esakal
मालवण, : शहरात दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात भाजपच्या नगरसेविका महानंदा खानोलकर गंभीर जखमी झाल्या. तर दोन युवतींसह अन्य एक युवकही जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अंजली लॉज समोरील रस्त्यावर घडला. आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते चिवला बीच येथे आयोजित विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी नगरसेविका खानोलकर जात होत्या. त्याचवेळी रॉक गार्डनकडून शहराच्या दिशेने येणाऱ्या एका दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.