कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी 'यांनी' घेतला पुढाकार

Malvan Panchayat Samiti Took Initiative For KatalShilpa Conservation Sindhudurg Marathi News
Malvan Panchayat Samiti Took Initiative For KatalShilpa Conservation Sindhudurg Marathi News
Updated on

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - मालवण तालुक्‍यातील कुडोपी, हिवाळे, वडाचापाट, किर्लोस, असरोंडी गावात आढळून आलेल्या पुरातन कातळ शिल्पांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मालवण पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. ही शिल्पे पर्यटनदृष्ट्या प्रसिद्धीस यावीत, यासाठी कातळ शिल्प ठिकाणी जाणारा रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी नियोजनासाठी व धोरण ठरविण्यासाठी मालवण पंचायत समितीची सभा कुडोपी येथील कातळ शिल्प ठिकाणी आयोजित केल्याची माहिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली. 

जिल्ह्याच्या पर्यटनात महत्त्वपूर्ण भर घालणारी कातळ शिल्पे आढळली आहेत. मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोंडी, हिवाळे, वडाचापाट या गावात ही अकालणीय कातळ शिल्प आहेत. पान घोड्यासह अनेक शिल्पाकृती कातळांवर कोरल्या आहेत. ही कताळशिल्प वैविध्यपूर्ण असून तिला प्राचीन ऐतिहासिक महत्त्व आहे. या कातळशिल्पांचे जतन होण्याच्या दृष्टीने मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे. 

शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे

ही कातळ शिल्पे ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ देतात. त्यामुळे या कातळ शिल्पाचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवली आहेत. ती कशाची आहेत? त्यातून काय व्यक्त होते? हे सांगणे कठीण आहे. या शिल्पकृती देशभरासह संपूर्ण जगात माहिती व्हाव्यात यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर त्या शिल्पांचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय यांच्या सहली किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून ऐतिहासिक माहिती सर्वत्र पोचविली जाणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले. 

कातळ शिल्पातून पर्यटन विकास

ही कातळ शिल्पे विकसित झाल्यास या भागातील पर्यटनदृष्ट्या विकास होईल. परिणामी जिल्ह्याच्या पर्यटनावर निश्‍चितच चांगला सकारात्मक परिणाम होणार आहे. कातळशिल्पांवर पान घोड्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येत आहे. तसेच अन्य काही कोरीव काम केलेली आहेत. या कोरीव कामांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून पर्यटक मालवण तालुक्‍यातील कुडोपी, किर्लोस, असरोडी, हिवाळे, वाडाचापाट येथे मोठ्या संख्येने दाखल होऊ शकतात. यासाठी प्राथमिक सुविधा म्हणजे तेथे जाण्या-येण्यासाठी रस्ता आवश्‍यक आहे. हा रस्ता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. ती सुविधा पहिली उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे या वेळी पराडकर यांनी सांगितले. 

अभ्यासक, तज्ज्ञांना निमंत्रण 

एक जानेवारीला मालवण पंचायत समितीची खास सभा कुडोपी येथील कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कातळशिल्पांच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केली आहे. या सभेला कातळ शिल्प अभ्यासक व संशोधक सुधीर रिसबुड, अस्मिता एम. जे., शिक्षक व अभ्यासक कमलेश गोसावी उपस्थित राहणार आहेत. या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती पराडकर यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com