Malvan resort swimming pool accident video viral
esakal
मालवण : वायरी (ता. मालवण) येथील एका रिसॉर्टमधील जलतरण तलावात उंचावरून उडी मारताना सांगली जिल्ह्यातील एका २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू (Malvan resort swimming pool accident) झाला. जलतरण तलावाच्या कमी खोलीच्या भागात उडी घेतल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.