Gram Panchayat Results : मालवणात भाजपचे वर्चस्व शिवसेनेचा धुव्वा: एकाच ग्रामपंचायतीवर यश

प्रशांत हिंदळेकर
Monday, 18 January 2021

सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरवात करण्यात आली.

मालवण (सिंधुदुर्ग) : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद वर्चस्व राखत शिवसेनेचा धुव्वा उडविला. शिवसेनेला केवळ एकाच ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखता आले. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मात देत घवघवीत यश मिळविले. तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज येथील तहसील कार्यालयात तहसीलदार अजय पाटणे, सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत झाली. 

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी सकाळपासूनच तहसील कार्यालय परिसरात गर्दी केली होती. तहसील कार्यालयात केवळ उमेदवार आणि प्रतिनिधी यांना प्रवेश देण्यात येत होता. अन्य ग्रामस्थांना पोलिस वसाहतीच्या परिसरात थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरवात करण्यात आली. मतमोजणीसाठी सहा टेबल लावण्यात आली होती. 
आडवली-मालडी ग्रामपंचायतीसाठी प्रभाग एकमधून सुनील जाधव (171 मते), सोनाली पराडकर (176 मते), भक्ती साटम (145 मते) मिळवून विजयी झाले तर अक्षय कदम, अमृता चव्हाण, सायली यादव यांचा पराभव झाला. प्रभाग दोन मध्ये संदीप आडवलकर (125 मते), दामिनी घाडीगावकर (124 मते) मिळवून विजयी झाले तर नारायण पांचाळ, सीमा घाडीगावकर यांचा पराभव झाला. 

प्रभागनिहाय.....
-प्रभाग क्रमांक तीनमधून ज्योती लाड, स्वप्नील लाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
 
प्रभाग क्रमांक तीनमध्ये सुमित सावंत (191 मते), अंकिता सावंत (211 मते) मिळवून विजयी झाले तर स्वप्नील आपटे, ज्योती सावंत यांचा पराभव झाला. 

-प्रभाग क्रमांक दोनमध्ये कार्तिकी निकम (50 मते), जयवंत तेली (55 मते) मिळवून विजयी झाले तर नयना देसाई, चंद्रकांत पोळ यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक तीनमध्ये मंदार वराडकर (71 मते), देवयानी कदम (75 मते) मिळवून विजयी झाले. तर सागर चुडनाईक, नेत्रा कुणकवळेकर यांचा पराभव झाला. 

-खरारे पेंडूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये अश्विनी पेडणेकर (306 मते), शैलेश परब (194 मते), सुनीता मोरजकर (217 मते) मिळवून विजयी झाले तर नीलम हिंदळेकर, नितीन राऊळ, विनोद सावंत, अमिता नाईक, योगीता पेंडूरकर यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक दोनमध्ये कृष्णा मांडकुलकर (249 मते), समृद्धी सरमळकर (304 मते), नेहा परब (330 मते) मिळवून विजयी झाले तर मयुरेश पेंडूरकर, मनीषा हिंदळेकर, प्रणाली सावंत यांचा पराभव झाला.कुणकवळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमधून शुभांगी मेस्त्री, श्रेया दळवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुरेश राणे (110 मते) मिळवून विजयी झाले तर प्रफुल्ल पवार यांचा पराभव झाला. 
 
-प्रभाग क्रमांक चारमध्ये विवेक जबडे (277 मते), संदीप सावंत (292 मते), वैष्णवी लाड (371 मते) मिळवून विजयी झाले तर राजेंद्र पाटकर, संजय पाटकर, साबाजी सावंत, प्रणाली सावंत यांचा पराभव झाला. 

गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायतीतून प्रभाग क्रमांक एकमध्ये शरद मांजरेकर (290 मते), एकादशी गावडे (317 मते), सुभाष लाड (238 मते) मिळवून विजयी झाले. वासुदेव पावसकर, शारदा मुणगेकर, संजय पाताडे, प्रशांत परब यांचा पराभव झाला. 

-प्रभाग क्रमांक दोनमध्ये प्राजक्ता चिरमुले (263), मेघा गावडे (232 मते), साबाजी गावडे (227 मते) मिळवून विजयी झाले तर प्राजक्ता परब, सरिता चिरमुले, भाऊ चव्हाण, मनीष जाधव यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक तीनमध्ये विरेश पवार (239 मते), शिल्पा तेली (223 मते), विभा परब (263 मते) मिळवून विजयी झाले तर प्रशांत डिकवलकर, प्रज्ञा चव्हाण, नावीन्या गावडे यांचा पराभव झाला. 

चिंदर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये केदार परुळेकर (315 मते), रिया घागरे (278 मते), दीपक सुर्वे (304 मते) मिळवून विजयी झाले तर सागर परुळेकर, रोहिणी घागरे, सतीश हडकर यांचा पराभव झाला.

 -प्रभाग क्रमांक दोनमध्ये राजश्री कोदे (280 मते), सानिका चिंदरकर (239 मते), शशिकांत नाटेकर (215 मते) मिळवून विजयी झाले तर जयवंती पाटणकर, उर्मिला मालवणकर, विश्वनाथ दळवी यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक तीनमध्ये दुर्वा पडवळ (207 मते), महेंद्र मांजरेकर (184 मते) मिळवून विजयी झाले तर ममता पांचाळ, सचिन चिंदरकर यांचा पराभव झाला. 

-प्रभाग क्रमांक चारमध्ये नम्रता महांकाळ (299 मते), जान्हवी घाडी (284 मते), निलेश रेवडेकर (239 मते) मिळवून विजयी झाले. वेदा लब्दे, प्रिया पालकर, भूषण पाताडे यांचा पराभव झाला. 

मसदे-चुनवरे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये ऋतुजा नार्वेकर (129 मते) केतकी प्रभू (145 मते), अंकुश नेरुरकर (151 मते) मिळवून विजयी झाले तर किरण कांदळकर, सुचिका सावंत, दत्तराम आंबेरकर यांचा पराभव झाला.

-प्रभाग क्रमांक दोनमध्ये धनश्री कांदळकर (173 मते), शमिका वाडकर (179 मते), कलाधर कुशे (163 मते) मिळवून विजयी झाले तर रेश्मा नेरुरकर, भाग्यश्री सावंत, अमित कुशे यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनिल जाधव (159 मते), रामदास पांजरी (145 मते), श्रेया परब (146 मते) मिळवून विजयी झाले तर गुलाब जाधव, रुपेश वर्दम, वैशाली परब यांचा पराभव झाला.

तालुक्यातील खरारे-पेंडूर, कुणकवळे, चिंदर, मसदे-चुनवरे, गोळवण-कुमामे-डिकवल या पाच ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले तर आडवली-मालडी या एकमेव ग्रामपंचायतीवर शिवसेनेला वर्चस्व राखता आले. चिंदर व मसदे चुनवरे या दोन ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात होत्या. या दोन्ही ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेण्यास यश मिळविले.

चिठ्ठीद्वारे निवड चिंदर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार रिया घागरे, रोहिणी घागरे या दोन्ही उमेदवारांना 278 मते मिळाली. समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली. यात रिया घागरे या विजयी झाल्या. 

भाजपचा जल्लोष
 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पाच ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद वर्चस्व राखल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी एकच जल्लोष केला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नारायण राणे यांचा विजय असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malvan sindhudurg Gram Panchayat Results sindhudurg political news