

Best time to visit Malvan Konkan
esakal
Sindhudurg Malvan Trip : नाताळची सुटी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणमध्ये दाखल पर्यटकांमुळे यंदाचा पर्यटन हंगाम विक्रमी ठरला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीसह मुख्य हंगाम संपला असून, गेल्या १५ दिवसांत मालवणच्या पर्यटन क्षेत्रात काही कोटीत उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. साहसी जलक्रीडा, हॉटेलिंग आणि लॉजिंग व्यवसायात बऱ्यापैकी उलाढाल झाली. एरव्ही हंगामात मासळीचे दर चढे असायचे; मात्र यावेळी मुबलक मासळीने दर आवाक्यात राहिल्याने मत्स्य खवय्यांनी ताज्या मासळीवर चांगलाच ताव मारला.