
-प्रशांत हिंदळेकर
मालवण : जिल्ह्याच्या किनारपट्टीवर हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पर्यटन हंगाम सुसाट आहे. यामुळे लाखोंची उलाढाल होत आहे. जिल्ह्यातील शिरोडा, वेंगुर्ले, देवगड, मालवण या महत्त्वाच्या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी आहे. मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांमुळे शिरोडा, तारकर्ली, देवबागकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी आहे. गुगल मॅपवरील चुकीच्या मार्गाचा त्रास पर्यटकांना बसल्याचे दिसून आले.