Malvan ZP : ठाकरे शिवसेनेवर आत्मपरीक्षणाची वेळ; मालवण तालुका हातून निसटला, युतीने मिळविली निर्विवाद सत्ता
Mahayuti Win : मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीने कोकणच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा मालवण यावेळी महायुतीच्या ताब्यात गेला.
मालवण : तालुक्याच्या सहाही जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समिती जागांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेना महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत मालवणमध्ये ठाकरे शिवसेनेला पहिल्यांदाच खातेही उघडता आले नाही.