प्रशासन म्हणते सारे आलबेल ; अवैध खैरप्रकरणाची पाळेमुळे मंडणगडात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

खेड येथे पकडण्यात आलेल्या खैराचा ट्रकची पाळेमुळे मंडणगड तालुक्‍याला जोडली असल्याची बाब उघड झाली आहेत.

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुका प्रगतीपासून दूर जरी असला तरी गेल्या काही महिन्यांमध्ये मंडणगड तालुका हा नैसर्गिक साधनसामुग्रीच्या अवैध व्यवसायासाठी केंद्रबिंदू बनला आहे. मंडणगड तालुक्‍यातील सर्वच शासकीय कार्यालयातून असे काही होत नसल्याचे खुलासे देत शासकीय पातळीवर मंडणगड तालुका आलबेल असल्याचे चित्र दाखवले जात आहे. नुकतीच याला चपराक देणारी घटना घडली आहे.

हेही वाचा - दैव बलवत्तर म्हणून वाचला तीचा जीव पण सहा म्हशीं कोसळल्या जागेवरच अन् -

खेड येथे पकडण्यात आलेल्या खैराचा ट्रकची पाळेमुळे मंडणगड तालुक्‍याला जोडली असल्याची बाब उघड झाली आहेत. या प्रकरणातील व्यक्ती ही मंडणगड तालुक्‍याशी निगडित आहे. या संदर्भात माध्यमांनी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या खैर तस्करीविरोधात वेळोवेळी आवाज उठवूनही तालुक्‍यातील संबंधित खात्याने त्याची दखल घेतली नाही. अशाच प्रकारे सप्टेंबर महिन्यात चिपळूण येथे महसूल प्रशासनाने अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केली होती. त्या वेळीही ती वाळू मंडणगडमधून घेऊन गेल्याचे उघड झाले होते.

आजही तालुका महसूल प्रशासन मंडणगड तालुक्‍यात कुठेही अवैध वाळू उत्खनन सुरू नसल्याचे सांगत आहे. या साऱ्या प्रकरणावरून अवैध व्यवसायाचे मूळ मंडणगडमध्ये असून येथील प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाढवळ्या शासकीय मालमत्ता तोडून वाहतूक केली जात असताना संबंधित विभाग यावर काहीच करीत नसल्याने असे प्रकार कोणाच्या मेहरबानीने सुरू आहेत? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

हेही वाचा - सावधान ! काँगो फिव्हर आजार आता माणसांतही होतोय संक्रमित - ​

आत्तापर्यंत एकही कारवाई नाही

जिल्हाभरात सर्वत्र पोलिस प्रशासनाकडून अवैध दारू, मटका व जुगार यावर जोरदार कारवाई सुरू असताना मंडणगड तालुक्‍यात मात्र आजवर एकही कारवाई झालेली नाही. तसेच तालुक्‍यात प्रचंड होणाऱ्या वृक्षतोडीबाबत येथील वनविभाग कोणतीही कायदेशीर कारवाई करीत नसल्याने पर्यावरणप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandangad due to illegal welfare case in all is good in khair in ratnagiri