Mandangad Ghat Reopens : मुंबई, पुणे अन् महाडला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! अखेर 'हा' महत्त्वाचा घाटमार्ग 4 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला; मंडणगड-दापोलीचा संपर्कही पूर्ववत

Mandangad Shenale Ghat Reopens After Four Days : मुसळधार पावसामुळे चार दिवस बंद असलेला मंडणगडमधील शेनाळे घाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रयत्नांनंतर वाहतुकीसाठी खुला झाला. त्यामुळे महाड, मुंबई आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.
Mandangad Shenale Ghat landslide latest update

Mandangad Shenale Ghat landslide latest update

esakal

Updated on: 

मंडणगड (रत्नागिरी) : मुसळधार पावसामुळे शेनाळे घाटातील देशमुखबाग परिसरात कोसळलेल्या मोठ्या दरडीमुळे गेल्या चार दिवसांपासून बंद असलेला घाटमार्ग अखेर शनिवारी (ता. ११) सायंकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अथक प्रयत्नांनंतर रस्त्यावर साचलेली माती, दगड आणि झाडे हटविण्यात यश आल्याने महाड, माणगाव, मुंबई व पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत सुरू (Shenale Ghat traffic restored after heavy rain) झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com