

Shedwai Mandangad Shri Kesharnath Temple Preserves 900 Year Old Vishnu Idol And Remarkable Shilahara Era Sculptural Heritage
sakal
मंडणगड: मंडणगड-दापोली मार्गावरील दहागावजवळून शेडवई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत सुमारे ९०० वर्षांचा प्राचीन शिल्पवारसा जपणारे श्रीकेशरनाथ मंदिर आहे. साध्या कौलारू रचनेतील या मंदिरात काळ्या ग्रेनाईट दगडात कोरलेली विष्णूची देखणी स्थानक मूर्ती असून, मूर्तीशास्त्रीय वैशिष्ट्यांवरून ती लक्ष्मीकेशव स्वरूपातील आहे, असे कोकण इतिहास परिषदेचे डॉ. अंजय धनावडे यांनी सांगितले.