esakal | पर्यटकांनी मंडणगडकडे का फिरवली पाठ... ?
sakal

बोलून बातमी शोधा

Mandangad Tourists  Why Turned Tourism Ratnagiri Marathi Newws

वेळास  तालुक्‍याला लाभलेला एकमेव स्वच्छ समुद्रकिनारा आजही दुर्लक्षित आहे. 

 

पर्यटकांनी मंडणगडकडे का फिरवली पाठ... ?

sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : कोकणातील मंडणगड तालुक्‍याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले असतानाही केवळ शासन , प्रशासनाच्या उदासीनतेमुळे येथील बलस्थाने दुर्लक्षित राहिली आहेत. तालुक्‍याचा पर्यटन विकास व्हावा, यासाठी आवश्‍यक असणारी शासन, प्रशासनाची मानसिकताच नसल्याचे चित्र आहे. तसेच येथील पर्यटनस्थळांचे आकर्षण निर्माण करण्यास यंत्रणा कमी पडते. म्हाप्रळ आंबेत पुलाअभावी महाडला जाऊन द्राविडी प्राणायम करत मंडणगड गाठण्याचे कष्ट करावे लागत असल्याने पर्यटकांनी मंडणगडकडे पाठ फिरवली. 

काही वर्षे काढण्याची मानसिकता

तालुक्‍यात हिंमतगड (बाणकोट), मंडणगड किल्ले व वेळासचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. तसेच ट्रेकर्सना खुणावणारे डोंगर, नद्यांचे पात्र उपलब्ध आहे. तालुक्‍याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून डोंगराळ परिसराने व्यापलेला हा तालुका अभ्यासकांना सुवर्णसंधी देणारा आहे. तालुक्‍यातील रस्ते दळणवळणसाठी आजही अडथळे ठरत आहेत. तालुक्‍यातील तीन महत्त्वकांक्षी प्रकल्प बाणकोट बागमांडला सी लिंक, आदर्श संसद ग्राम योजना व मॉडेल कॉलेज हे अर्धवट स्थितीत आहेत.

हेही वाचा -HOTOS : देशातील सर्वांत वेगळ्या धाटणीची अशी ही पैलवान मशीद... -

पर्यटन हंगाम अर्थव्यवस्थेस दणका

हे प्रकल्प पूर्ण झाल्यास नजीकच्या दापोलीच्या तुलनेत मंडणगडचा विकास समांतर दिसला असता. त्यामुळे यंदाच्या डिसेंबर अखेरच्या पर्यटन हंगामातून येथील अर्थव्यवस्थेस चालना मिळण्याची अपेक्षा मात्र फोल ठरली आहे. यंदाचे नववर्षाचे स्वागत स्थानिकांकडून झाले. मात्र, पर्यटकांची अनुपस्थिती जाणवली. मंडणगडात येणारे अधिकारी हे काही वर्षे इथे काढण्याच्या मानसिकतेत असतात. त्यामुळे व्हीजन ठेवून काम करणाऱ्यांची उणीव भासते. परिघाबाहेर जात तालुक्‍याला काही द्यावं, ही भूमिका दिसत नाही 

हेही वाचा - नव्या वर्षाची सुरवात दंडाने
 

प्रमोशन करण्यास स्थानिकांना अपयश

 लोकप्रतिनिधींकडे दूरदृष्टीचा अभाव आहे. पर्यटनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प बाणकोट बागमांडला सागरी सेतू रखडलेलाच आहे. तालुक्‍यात वेळास वगळता कोठेही समुद्रकिनारा नाही. त्यातही वेळास समुद्रकिनारा तेथील पर्यटन निवास व्यवस्था, किल्ले हिंमतगड, किल्ले मंडणगड, सावित्री बॅक वॉटर, उन्हवरे येथील गरम पाण्याचे कुंड, आंबडवे व तालुक्‍यातील धार्मिक स्थळे मंदिरे, प्राचीन मूर्ती व येथील पर्यावरणाचा ब्रॅंड तयार करून या ब्रॅंडचे प्रमोशन करण्यास स्थानिकांना अपयश आले आहे. 

loading image
go to top