दोनशे फुटावरून कोसळणारा मांगेली धबधबा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

मांगेली धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील निसर्ग सौदर्य, उंच दिसणारा कसईनाथ डोंगर, वळणदार खोक्रल - मांगेली घाटी आणि या घाटीतून दिसणार हिरवगार ग्रामीण पर्यटन. या सर्वामूळे मांगेलीचा हा निसर्ग संपन्न धबधबा पर्यटकांच्या पसंतीला उतरतो. 

दोडामार्ग - गर्द वनराईत दाट धुक्यात 200 फुटांवरून पांढरा शुभ्र फेसाळत कोसळणारा मांगेलीचा धबधबा नेहमीच पर्यटकांना आकर्षिक करतो. येथील निसर्गांचा आनंद घेण्यासाठी तरूणाई नेहमीच गर्दी करते.

हा धबधबा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने तिन्ही राज्यातून पर्यटक येथे वर्षापर्यटनासाठी येतात. मोहून टाकणारा निसर्ग मनाला वेगळाच आनंद देतो. आंबोली इतकाच निसर्गरम्य असलेला दोडामार्गातील या मांगेली धबधब्यास वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती मिळत आहे. या धबधब्याच्या ठिकाणी जाताना डोंगर दर्यातून, दाट धुकं कापत जावं लागत.

मांगेली धबधब्याचे वैशिष्ट्य

मांगेली धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील निसर्ग सौदर्य, उंच दिसणारा कसईनाथ डोंगर, वळणदार खोक्रल - मांगेली घाटी आणि या घाटीतून दिसणार हिरवगार ग्रामीण पर्यटन. या सर्वामूळे मांगेलीचा हा निसर्ग संपन्न धबधबा पर्यटकांच्या पसंतीला उतरतो. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangeli waterfall in Dodamarg Sindhudurg