बागेत मोहोराचे पूजन करताना आंबा बागायतदार संदीप डोंगरे | kokan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बागेत मोहोराचे पूजन करताना आंबा बागायतदार संदीप डोंगरे
बागायतदार संदीप डोंगरे यांनी मोहोराचे पुजन केले

बागेत मोहोराचे पूजन करताना आंबा बागायतदार संदीप डोंगरे

रत्नागिरी : हापूसच्या कलमांना काही ठिकाणी मोहोर येण्यास प्रारंभ झाला आहे. या मोहोरातून पहिल्या टप्प्यातील उत्पादन मिळते. हे लक्षात घेऊन रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील बागेत आलेल्या मोहोराचे बागायतदार संदीप डोंगरे यांनी पूजन केले.

रत्नागिरी जिल्ह्यात लांबलेल्या पावसामुळे आंबा झाडांना पालवी येऊ लागली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम पंधरा दिवसांनी पुढे जाईल, असा अंदाज बागायदार वर्तवित आहेत. या परिस्थितीतही रत्नागिरी तालुक्यातील काही बागांमधील झाडांना मोहोर येऊ लागला आहे. हा मोहोर टिकवून ठेवण्यासाठी बागायतदार प्रयत्न करत आहेत. मोहोर आलेली झाडे हे कातळ परिसरातील आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये वातावरणात बदल झाला. थंडीही जाणवू लागली आहे. हे वातावरण मोहोराला पोषक आहे. पुढील काही दिवसांत कणी येण्यास सुरवात होईल. हा मोहोर टिकला, तर जानेवारी महिन्याच्या अखेरीस आंबा होऊ शकेल. पहिल्या टप्प्यातील हापूसला दर अधिक मिळत असल्यामुळे बागायतदार डोंगरे यांनी सध्या झाडावर आलेल्या मोहोराचे शास्त्रीय पद्धतीने पूजन केले.

हेही वाचा: नागपूर : हिरवा वाटाणा २५०, कोथिंबीर १५० रूपये किलो!

डोंगरे म्हणाले, ‘‘यंदा पाऊस उशिरापर्यंत राहिला असला तरीही रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे, गोळप, नाखरे, पावस या परिसरातील कातळावरील काही भागांमधील हापूसच्या बागांना मोहोर येऊ लागला आहे. हे प्रमाण दहा ते पंधरा टक्के आहे. दसऱ्याच्या दरम्यान आलेल्या मोहोराच्या काही तुऱ्यातून कैरीची कणीही दिसू लागली आहे. आंब्याची पहिली पेटी हाती येताच तिचे पूजन करतो. पण आंब्याला आलेल्या मोहोरातून फळ तयार होत असते. हे लक्षात घेऊन त्या मोहोराचे स्वागत करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केले आहे.’’

मोहोर जपण्यासाठी औषध फवारणी :
पावससह परिसरातील काही भागात हापूस कलमांना मोहोर आला आहे. त्या मोहोरावर पाऊस पडला, तर बुरशी तयार होते. त्यासाठी पाऊस पडला तर बुरशीनाशकांची फवारणी करावी लागते. सध्या आलेल्या मोहरातून १२० दिवसांनी फळ तयार होईल. साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आंबा तयार होईल.

loading image
go to top