हिरवा वाटाणा २५०, कोथिंबीर १५० रूपये किलो! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vegetables

नागपूर : हिरवा वाटाणा २५०, कोथिंबीर १५० रूपये किलो!

नागपूर : हिवाळ्यात भाजीपाला उत्पादनासाठी पोषक वातावरण असते. परराज्यातून भाजीपाल्याची आवक वाढत असते. बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होऊन दर कमी होतात. मात्र, यंदा अवेळी आलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची सर्व गणिते बिघडली आहेत. नोव्हेंबर महिना सुरू होऊनही भाजीची आवक अद्यापही मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे भाजीचे भाव चढेच आहेत. नोव्हेबर महिन्याच्या अखेरपर्यंत हीच स्थिती राहणार आहे. भाजीची आवक वाढण्यासाठी डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा: नागपूर : कार्यालयात सहकारी महिलेशी अश्‍लील चाळे

अवेळी आलेल्या पावसामुळे यंदा शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे दिवाळीनंतर येणारा भाजीपाला पाण्यात वाहून गेला. परिणामी, भाजीपाल्याची कमतरता जाणवत आहे. ग्राहकांना वाढीव दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. टोमॅटो आणि कोथिंबिरचे भाव सर्वाधिक वाढलेले आहे. टोमॅटो किरकोळ बाजारात १०० रुपये तर कोथिंबीर १५० रुपये किलोवर पोचले आहे. हिरवे वाटाणे सध्या दिल्लीवरून येत असून आवक कमी असल्याने त्याचे भाव प्रति किलो २०० ते २५० रुपये किलोवर पोचले आहे.

आवक कमी असल्याने सर्वच भाज्या किरकोळ बाजारात ६० ते १०० रुपये किलो झालेल्या आहेत असे अडतिया भाजी संघटनेचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.

ठोक बाजारातील भाजीपाला दर (रुपये प्रति किलो)

कोथिंबीर - ८० रुपये ,वांगे ३० रुपये ,गवार शेंग - ३० रुपये ,मेथी - ४० रुपये ,हिरवी मिरची - ३० रुपये ,चवळी - ४० रुपये ,फुलकोबी - ४० रुपये ,पानकोबी १५ रुपये ,टोमॅटो - ८० रुपये ,भेंडी - ३० रुपये ,शिमला मिरची - ३० रुपये ,तोंडले - ३० रुपये ,कारले - ३० रुपये ,कोहळा - ३० रुपये ,दुधी भोपळा - १५ रुपये ,पालक - १० रुपये ,मुळा - २० रुपये ,ढेमस - ३० रुपये ,गाजर -३० रुपये

loading image
go to top