आंबाप्रेमींचा हापूस अहमदाबादला रवाना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

पावस परिसरात हापूस आंबा कलम लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.

पावस (रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्‍यातील गणेशगुळे येथील प्रगत आंबा बागायतदार शशिकांत बाबू शिंदे यांनी या मोसमातील हापूस आंब्याच्या पाच पेट्या अहमदाबाद मार्केटला पाठवून पहिला आंबा पेट्या पाठवण्याचा मान मिळवला. पेटी प्रथम पाठवण्याचा मान सलग सहाव्या वर्षी मिळवला. पावस परिसरात हापूस आंबा कलम लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.

दरवर्षी हवामानाचा विपरित परिणाम होत असल्यामुळे अनेकांचा आंबा मोसम कमी जास्त प्रमाणात असतो. अनेक फवारण्या करून आंबा पीक वाचवण्याचे काम प्रत्येक आंबा बागायतदार करत असतो. तालुक्‍यातील गणेश गुळे येथील शशिकांत बाबू शिंदे हे वयोवृद्ध आंबा बागायतदार गेले अनेक वर्ष आपला व्यवसाय करताना आंबा बागेची योग्य जोपासना, फवारणी व बागेत साफसफाई करणे याकडे प्रामुख्याने लक्ष देतात. त्याच बरोबर समुद्रकिनाऱ्यावर असलेली बाग तिला मिळालेले पोषक वातावरण यामुळे गेली पाच वर्ष डिसेंबर-जानेवारी यादरम्यान पहिली पेटी पाठवण्याची परंपरा चालू ठेवली आहे.

हेही वाचा - जीवाणूमुळे होणाऱ्या व्याधींवर अनेक औषधे उपलब्ध असल्यामुळे ते व्याधी बरे करणे सोपे आहे

याबाबत शिंदे म्हणाले, आंबा बाग तयार करताना त्याची योग्य निगा फळधारणेच्या वेळी योग्य ती काळजी घेऊन मुलाप्रमाणे त्याचे संगोपन करण्याचे काम गेली अनेक वर्ष करत आहे.
आंबा काढणी तंत्रज्ञान विकसित करणार १८ जानेवारी २०२१ रोजी ४ डझन, पाच डझन आणि सहा डझन अशा पाच पेट्या अहमदाबाद मार्केटला रवाना करण्यात आल्या. त्यामुळे यापुढील पेट्या येत्या काही दिवसांत पाठवल्या जातील, त्यादृष्टीने आंबा काढणी तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mango from konkan exports to ahmedabad from pawas in ratnagiri