esakal | आंबा वाहतूक यातून करण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Mango Transport Through Train SIndhudurg Marathi News

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील सर्वच वाहतूक बंद झाली आहे. अनेक प्रकारच्या मालाची आयात निर्यात मंदावली आहे. याचा फटका कोकणातील आंबा बागायतदारांना बसला आहे.

आंबा वाहतूक यातून करण्याची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - कोकण रेल्वेच्या मालवाहतूक करणाऱ्या बोगीतून आंबा निर्यात करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी केआरसी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सुभाष मळगी, कार्याध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी कोकण रेल्वे व्यवस्थापन व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील सर्वच वाहतूक बंद झाली आहे. अनेक प्रकारच्या मालाची आयात निर्यात मंदावली आहे. याचा फटका कोकणातील आंबा बागायतदारांना बसला आहे. सद्यस्थितीत आंबा पिकुन तयार झाला असून तात्काळ बाजारपेठेत न पोहोचल्यास बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.

या बागायतदारांना दिलासा देण्यासाठी कोकण रेल्वेने पुढाकार घ्यावा कुडाळ, झाराप, सावंतवाडी यापैकी कोणत्याही एका रेल्वे स्थानकावरुन आंबा निर्यात करण्यासाठी मालवाहतूक गाडया उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी केआरसी एम्लॉईज युनियनने केली व कोकणातील आंबा बागायतदारांना ही सुविधा दिल्यास कोकण रेल्वेचा कामगार व केआरसी एम्प्लॉईज युनियनचा प्रत्येक कार्यकर्ता आंबा बागायतदारांना लॉक डाऊनच्या काळातही सेवा देण्याकरीता तयार आहे, असे केआरसी एम्प्लॉईज युनियनकडून जाहीर करण्यात आले.

कोकण रेल्वे व्यवस्थापनाने त्याचा सकारात्मक विचार करुन आंबा बागायतदारांसाठी सुविधा देण्यासंदर्भात सकारात्मक पाऊल उचललेले आहे. आंबा बागायतदारांना आर्थिक संकटातून सोडविण्याठी आपण पुढाकार घेऊन रेल्वेच्या सुविधेतून आंबा निर्यात कसा करता येईल यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा त्यासाठी कोकण रेल्वे के आर सी एम्प्लॉईज युनियनचा पूर्ण पाठीबा राहील, असे म्हटले आहे. 
 

loading image