esakal | शीळमध्ये घरावर आंब्याचे झाड कोसळले; मध्यरात्री झोपेतच घडला प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

शीळमध्ये घरावर आंब्याचे झाड कोसळले; मध्यरात्री झोपेतच घडला प्रकार

शीळमध्ये घरावर आंब्याचे झाड कोसळले; मध्यरात्री झोपेतच घडला प्रकार

sakal_logo
By
राजेंद्र बाईत

राजापूर : तालुक्यात रविवारपासून (11) पडणाऱ्या जोरदार पावसामुळे शीळ येथील जयकुमार बिर्जे आणि विश्‍वास बिर्जे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले. झाड पडलेल्या खोलीमध्ये विश्‍वास बिर्जे पत्नीसह, दोन मुले झोपली होती. रात्री एक वाजता घडलेल्या या घटनेत झोपलेल्या मुलांना कोणतीही इजा झालेली नाही. मात्र विश्‍वास आणि त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाल्या आहेत.

रात्री जेवण उरकून विश्‍वास बिर्जे पत्नी निलम, दोन छोट्या मुलांसह घराच्या मागील पडवीतील खोलीत झोपले होते. मध्यरात्री एक वाजता अचानक अंगावर मोठे काहीतरी पडल्याची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे घाबरलेले पती-पत्नी तत्काळ जागे होवून त्यांनी खोलीतील लाईट सुरू केली. खोलीमध्ये छप्परावरील तुटलले पत्रे पाहून स्वतः जखमी झालेल्या स्थितीमध्ये छोट्या मुलांना घेवून खोलीबाहेर पडले. ही माहिती शिळचे उपसरपंच अशोक पेडणेकर आणि सहकार्‍यांना कळताच त्यांनी तत्काळ किरकोळ जखमी झालेल्या विश्‍वास बिर्जे पत्नी-पत्नीला खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले.

हेही वाचा: 50 वर्षापूर्वीच्या भाताच्या 9 देशी वाणांचे संकलन; कोकणी शेतकऱ्याचा प्रयोग

सद्यस्थितीमध्ये दोघेही सुस्थितीत असल्याची माहिती उपसपरपंच पेडणेकर यांनी दिली. आज सकाळी पडवीच्या छप्परावर पडलेले आंब्याचे झाड बाजूला करून पडवी मोकळी करण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. सरपंच नामदेव गोंडाळ, तलाठी श्री. कोकरे आदींनी घटनास्थळी भेट देवून नुकसानाची पाहणी आणि पंचनामा केला. आंब्याचे झाड पडून नुकसान झालेली पडवी सुस्थितीत होईपर्यंत बाजूच्या घरामध्ये बिर्जे कुटुंबीयांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपसरपंच श्री. पेडणेकर यांनी दिली.

loading image