esakal | 50 वर्षापूर्वीच्या भाताच्या 9 देशी वाणांचे संकलन; कोकणी शेतकऱ्याचा प्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

50 वर्षापूर्वीच्या भाताच्या 9 देशी वाणांचे संकलन; कोकणी शेतकऱ्याचा प्रयोग

50 वर्षापूर्वीच्या भाताच्या 9 देशी वाणांचे संकलन; कोकणी शेतकऱ्याचा प्रयोग

sakal_logo
By
राजेंद्र बाईत

राजापूर : तालुक्यातील तेरवण येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश जोग यांनी भाताच्या देशी वाणांच्या संवर्धनासह प्रचार आणि प्रसाराचा ध्यास घेतला आहे. सुमारे पन्नास वर्षापूर्वी कोकणामध्ये (kokan) लागवड केली जात असलेल्या आणि संकरीत प्रजातींच्या युगामध्ये काहीसे हद्दपार झालेल्या नऊ प्रकारच्या देशी वाणांचे त्यांनी संकलन केले. त्यामध्ये डायबेटीसच्या रूग्णांना उपयुक्त ठरणार्‍या शुगर फ्री (suger free) असलेल्या रक्तश्‍वेता या वाणाचाही समावेश आहे. त्याच्यातून, भविष्यामध्ये ‘सीड बँक’ (see bank) विकसित करताना भाताची (rice) ही देशी वाण शेतकर्‍यांना मोफत देणार असून त्यातून कोकणामध्ये ‘हायब्रीड’ (संकरीत) प्रजातींच्या वाणांच्या युगामध्ये पुन्हा एकदा देशी वाणांची रूजवात होणार आहे.  

जोग यांनी संवर्धन केलेल्या देशी वाणांमध्ये 120 ते 125 दिवस कालावधी असलेले म्हाडी (कमी उंची), सुरती कोलम (मध्यम उंची), जिरवेल (मध्यम उंची), लाल्या (उंच), जया (मध्यम), 130 ते 135 दिवसांचा कालावधी असलेले आंबेगाव (मध्यम उंची), शुगर फ्री असलेले 90 दिवसांचे रक्तश्‍वेता (कमी उंची), 135 दिवसांचे वेलकट (उंच), 145 दिवसांचे सोरटी (उंच) आदींचा समावेश आहे. सुमारे पन्नास वर्षापूर्वी शेतकर्‍यांकडून देशी वाणांचा वापर केला जात होता. मात्र, हायब्रीड वाणांच्या वापरामध्ये देशी वाण हद्दपार होवू लागली असून या देशी वाणांबाबत नवी पिढी काहीशी अनभिज्ञ होवू लागली आहे. मात्र, कमी खर्चामध्ये जादा उत्पादन देणार्‍या संकरीत वाणांचा अधिक वापर होत असला तरी, भविष्यामध्ये देशी वाणांचेही महत्व वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे देशी वाणांचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याचा ध्यास श्री. जोग यांनी घेतला आहे.

हेही वाचा: रत्नागिरीत दोन दिवसांसाठी रेड अॅलर्ट; हवामान विभागाचा इशारा

देशी वाणांचे संकलन करण्यासाठी मित्र संदीप म्हात्रे यांचे सहकार्य लाभले असून ती कुडाळ, दापोली येथील शेतकर्‍यांकडून संकलीत केल्याचे त्यांनी सांगितले. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब चालला आहे. अन्नपदार्थाची सात्विकता कमी होत चालली आहे. रासायनिक कीडनाशकांचे अंश पिकांमध्ये, पर्यायाने अन्नात राहात असल्याने त्याचा अनिष्ठ परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे शेतीसाठी जीवामृताचा उपयोग करीत असल्याचे प्रकाश जोगयांनी सांगितले. जीवामृत तयार करण्यासाठी वीस किलो देशी गायीचे शेण, वीस लिटर गोमुत्र, प्रत्येकी एक किलो बेसण पीठ आणि काळा गुळ या मिश्रण पाण्यामध्ये 48 तास कुजवत ठेवायचे. त्यानंतर, त्याचा शेतीला मात्रा देण्यासाठी उपयोग केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. लावणीनंतर पंधरा दिवसांनी तर, पीक फुलोर्‍यात येण्यापूर्वी पंधरा दिवस अशी दोन वेळा मात्रा दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

प्रकाश जोग, प्रगतशील शेतकरी

"कोकणातील वातावरणामध्ये देशी वाण उपयुक्त ठरत आहेत. मात्र, संकरीत वाणांच्या वापरामध्ये देशी वाण काहीसे हद्दपार झाले आहेत. अशा देशी वाणांचे संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यातून भविष्यामध्ये ‘सीड बॅक’ विकसित करण्याचा मानस आहे."

हेही वाचा: आइस क्यूबमुळे चेहऱ्याला होतात फायदे; जाणून घ्या वापरण्याची पद्धत

loading image