esakal | कणकवलीत आठवडा बाजार बंदला हरताळ 

बोलून बातमी शोधा

market issue kankavli konkan sindhudurg}

कणकवली तालुक्‍यात गेल्या तीन महिन्यात कोरोनाचे फारसे रुग्ण आढळलेले नाहीत. तरीही कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी कणकवली शहरात भरणारा मंगळवारचा आठवडा बाजार रद्द करण्यात आल्याचे कणकवली नगरपंचायतीकडून जाहीर करण्यात आले होते.

kokan
कणकवलीत आठवडा बाजार बंदला हरताळ 
sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कणकवली शहरात भरणारा मंगळवारचा आठवडा बाजार आज (ता.2) पासून बंद करण्यात आला होता. मात्र शहर तसेच तालुक्‍यातील नागरिकांनी नेहमीप्रमाणे कणकवली बाजारात गर्दी केली. तसेच बाहेरील विक्रेत्यांनीही शहराच्या बाजारपेठ परिसरात दुकाने थाटली होती. 

कणकवली तालुक्‍यात गेल्या तीन महिन्यात कोरोनाचे फारसे रुग्ण आढळलेले नाहीत. तरीही कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी कणकवली शहरात भरणारा मंगळवारचा आठवडा बाजार रद्द करण्यात आल्याचे कणकवली नगरपंचायतीकडून जाहीर करण्यात आले होते. तसे निर्देशही शहरात येणारे विक्रेते, व्यापारी यांना देण्यात आले होते. त्यानुसार आज नेहमीच्या तुलनेत कमी संख्येने विक्रेते आणि व्यापारी आले होते. मात्र नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. 

सोशल डिस्टन्सचा फज्जा 
कणकवली बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढल्यानंतर विक्रेत्यांनीही तेलीआळी डीपी रोड तसेच बाजारपेठेमध्ये दुकाने थाटली. तसेच शहराच्या वेशीबाहेर दुकाने सुरू केलेल्या विक्रेत्यांनीही नंतर शहरात येऊन व्यवसाय सुरू केला. त्यामुळे सोशल डिस्टन्सचाही फज्जा उडाला. 

संपादन - राहुल पाटील