

House Gutted in Mangao Budruk Fire Incident; Short Circuit Suspected, Heavy Loss Reported
esakal
-अमित गवळे
पाली: सुधागड तालुक्यातील माणगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील वडाचामाल (धनगरवाडा) येथे शनिवारी (ता. 28) हृदयद्रावक घटना घडली. शॉक सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत गंगुबाई धोंडू बोडेकर व धोंडू बाळू बोडेकर यांचे घर जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत घरातील सर्व संसारोपयोगी वस्तूंचा कोळसा झाला असून कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.