ना नफा, ना तोटा ; मतलई वाऱ्याचा मच्छीमारीवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

म्हाकूळला बाजारात किलोचा दर चांगला मिळत आहे; परंतु माल कमी असल्याने ना नफा, ना तोटा तत्त्वावरच मासेमारी करावी लागत आहे.

रत्नागिरी : मतलई वाऱ्यामुळे मच्छीमारी करताना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे मासळीच्या रिपोर्टवर परिणाम झाला आहे. गेले चार दिवस ही परिस्थिती उद्‌भवली असली तरीही सध्या मच्छीमारांना म्हाकूळवरच समाधान मानावे लागत आहे. म्हाकूळला बाजारात किलोचा दर चांगला मिळत आहे; परंतु माल कमी असल्याने ना नफा, ना तोटा तत्त्वावरच मासेमारी करावी लागत आहे.

हंगामाच्या सुरवातीपासूनच वातावरणातील बदलांना सामोरे जात मच्छीमारी व्यावसाय सुरू आहे. कमी दाबाचा पट्टा, वादळी वारे याबरोबरच परराज्यातील नौकांचे अतिक्रमण अशा विविध संकाटांना सामना रत्नागिरीतील मच्छीमारांना करावा लागत आहे. गेले चार दिवस मतलई वारे वाहू लागले असून पारा घसरला आहे. दुपारपर्यंत वारे वाहत राहल्यिामुळे समुद्र खवळलेला आहे.

हेही वाचा - लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करत तब्बल पाच जणींशी केले लग्न; वीरपत्नींना हेरुन पेन्शन मंजूर करतो म्हणत केली फसवणूक -

पाण्याला करंट असल्याने समुद्रात नौका उभ्या करुन मासेमारी करणे शक्‍य होत नाही. जाळ्यांमध्ये मासेच येत नाही. मासाही खोल समुद्राकडे वळलेला आहे. १० ते १५ वावात मिळणारा मासा पुढे सरकला असून २५ ते २८ वावापर्यंत मच्छीमारांना पाठलाग करत जावे लागत आहे. एवढा प्रवास करूनही म्हणावी तशी मासळी मिळत नाही.

पर्ससिननेटसह ट्रॉलिंगला म्हाकूळ मासा ७० ते ८० किलो तर छोट्या बोटींना १० ते १२ किलो मिळत आहे. किलोला ३२० ते ३७० रुपयांपर्यंत दर आहे. हा मासा निर्यातीसाठी पाठविला जात आहे. मतलई वाऱ्यामुळे माशांचा रिपोर्टही मंदावलेला आहे. काही नौकांना ५ ते १० टप बांगडा मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मलपी नौकांनी रत्नागिरीच्या हद्दीत केलेल्या मासेमारीचा फटका स्थानिकांना बसत आहे. सरंगा, पापलेट यासारखे माशांचे दर शंभर रुपयांनी वधारले आहेत.

हेही वाचा -  बापरे ! चिपळूणात चक्क गुटखा निर्मितीचे कारखाने -

"नौकांना रिपोर्ट मिळत नसल्याने अनेकांनी नौका किनाऱ्यावर उभ्या ठेवलेल्या आहेत. यंदाच्या हंगामात दुष्काळी स्थिती असून मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडत आहेत."

- अभय लाकडे, मच्छीमार

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: matalai wind effect on fishing business in kokan only makul fish are available but in very less in ratnagiri