"मातृभूमी'चा आणखी एक संचालक गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

चिपळूण - मोठमोठ्या परताव्याची आमिषे दाखवून जिल्हाभरातील गुंतवणूकदाराना गंडा घालणाऱ्या मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या चार संचालकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी एका संचालकास पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

प्रदीप गर्ग, मीरा रोड मुंबई ठाणे असे अटक झालेल्या संचालकाचे नाव आहे. यापूर्वी कंपनीच्या दोन संचालकांना अटक केली होती. आतापर्यंत तिघा सचालकांना अटक केली असून, चौथा संचालक अद्यापही फरारच आहे. चिपळूण पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

गर्ग यास मुंबईतून चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे. या कंपनीने जिल्हाभरात मोठ मोठ्या परताव्याची आमिषे दाखवून सुरवातीला एक-दोन वेळेस व्याजाची रक्कम गुंतवणूकदारांना दिली होती, मात्र त्यानंतर या कंपनीने गुंतवणूकदारांना चुना लावत जिल्ह्यातून पोबारा केला होता. याप्रकरणी कंपनीच्या चौघा संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. सुमारे जिल्हाभरातून 3 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांनी कोट्यवधीची गुंतवणूक केल्याचे पुढे आले होते. अधिक तपास चिपळूण पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Matrubhumi Director arrested