esakal | कोकण रेल्वे मार्गावर धावणार मत्स्यगंधा एक्स्प्रेस; असा असेल रूट
sakal

बोलून बातमी शोधा

Social commitment to rail for flood victims in Kerala

कोकण रेल्वे मार्गावर धावणार मत्स्यगंधा एक्स्प्रेस; असा असेल रूट

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस(matsyagandha express)येत्या १५ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे.कोरोनाच्या काळात अनेक रेल्वे गाड्या बंद झाल्या. त्यामध्ये 02619/02620 क्रमांकाच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगलोर सेंट्रल (Lokmanya Tilak Terminus to Mangalore Central)या मार्गावर धावणाऱ्या या गाडीचा समावेश होता. कोरोनाच्या काळात ही गाडी सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल या नावाने धावत आहे. (matsyagandha-express-running-on-kokan-railway-line-kokan-railway-update-marathi-news)

गेल्या काही काळापासून बंद असलेली ही गाडी येत्या १५ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. मंगलोर ते एलटीटी मार्गावरील 02619 क्रमांकाची गाडी मंगलोर येथून येत्या १५ जून ते ३० जून या कालावधीत दररोज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.

हेही वाचा- दुर्मिळ होत चाललेल्या 'बांबू'विषयी गुणकारी फायदे माहिती आहेत? जे आपल्या आरोग्यावरही करतात चांगला परिणाम

परतीच्या मार्गावर 02620 ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६ जून ते एक जुलै या काळात दररोज दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी मंगलोर येथे पोहोचेल. या गाड्यांना बावीस डबे असतील. गाडी पूर्णपणे आरक्षित असेल. एलटीटी-मंगलोर मार्गावरील गाडीला माणगाव आणि खेड हे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन अधिक थांबे देण्यात आले आहेत.