esakal | दुर्मिळ होत चाललेल्या 'बांबू'विषयी गुणकारी फायदे माहिती आहेत? जे आपल्या आरोग्यावरही करतात चांगला परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्मिळ होत चाललेल्या 'बांबू'विषयी गुणकारी फायदे माहिती आहेत? जे आपल्या आरोग्यावरही करतात चांगला परिणाम

दुर्मिळ होत चाललेल्या 'बांबू'विषयी गुणकारी फायदे माहिती आहेत? जे आपल्या आरोग्यावरही करतात चांगला परिणाम

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : भारतात आयुर्वेदामध्ये बांबूला(bamboo)अतिशय महत्त्व आहे. बांबूच्या खोडांच्या फेऱ्यात तयार होणारे वंशलोचन थंड पौष्टिक आणि कामोत्तेजीत म्हणून वापरतात. याचबरोबर बांबूच्या भाजीचे औषधी गुणधर्म आहेत. भारत सरकारनेही देशातील शेतकऱ्यांच्या (Farmer)आर्थिक विकासासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. यामध्ये नॅशनल बांबू मिशन (National Bamboo Mission)या योजनेचा भाग आहे. नॅशनल बांबू मिशन अंतर्गत शेतकर्‍यांना अनुदान दिले जाते शेतकऱ्यांच्या सवलतीच्या दराने टिशू कल्चर बांबू (Tissue culture bamboo)रोपांचा मोठा पुरवठा करण्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना या नावाने योजना देखील शासन राबवत आहे. एवढेच नाही तर चीनमध्ये देखील उत्तम कागद बनवण्यासाठी या बांबूचा वापर केला जातो. बांबूचा वापर कपडे तयार करणे ,साॅक्स तयार करणे, अशा अनेक वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. बांबूच्या लाईफ सर्कल मध्ये बांबूला एकदाच फुले येतात आणि त्यानंतर ते झाड वाळून जाते.अशा या बहुगुणी बांबू विषयी आज आपण जाणून घेऊया...(health-benefits-of-bamboo-also-have-a-good-effect-article-marathi-news)

बांबूची जीवनशैली

बांबूच्या पानाला लहान देठ असतो. बांबूचा जमिनीकडचा भाग पानांनी वेढलेला असतो; मात्र ही पाने लगेच गळतात. फुले गवतांच्या फुलांसारखी बारीक असून त्यांचे गुच्छ असतात. त्यांना आयुष्यात एकदाच फुले येतात आणि ती आल्यानंतर बांबू मरून जातात. बहुतेक बांबूंना क्वचितच दरवर्षी फुले येतात. काही बांबूंना ६५ वर्षांनी, तर काही मोजक्या बांबूंना १३० वर्षांनी फुले येतात. भारतात बांबूंना ३२ व ६० वर्षांनी फुले येतात आणि ती सर्वत्र एकाच वेळी येतात. अशी वनस्पती इतरत्र नेऊन लावली, तरी तिला त्याच वेळी फुले येतात. फळे शुष्क व कणस्वरूप असतात. बांबूच्या बिया भाताप्रमाणे शिजवून खातात. फळे व बिया दुर्मिळ असल्याने बांबूची लागवड मुनवे व कलमे लावून करतात.

खरंतर बांबूचे उगमस्थान आशिया आहे. जगातल्या उष्ण आणि थंड तापमान असलेल्या प्रदेशात त्याचा प्रसार होतो. भारतात बांबूच्या 10 जाती आढळतात. भारतात पश्चिम आणि दक्षिण भागातून नैसर्गिकरित्या हा वाढलेला आढळतो. हिमालयात समुद्रसपाटीपासून 3,100 मी. उंचीपर्यंत तो आढळतो. आफ्रिकेच्या उष्ण भागात बांबूच्या कमी जाती आढळतात तर दक्षिण अमेरिकेमध्ये अँडीज पर्वतात हिमरेषेपर्यंत तो दिसून येतो. महाराष्ट्रात बांबूच्या ऑक्सिटेनँथेरा स्टॉक्साय आणि ऑक्सिटेनँथेरा रिचेयी या दोन जाती प्रामुख्याने आढळतात. चीनमध्ये उच्च दर्जाचा कागद बनवण्यासाठी बांबूच्या आतला नरम आणि मुभा वापरला जातो त्याच बरोबर बांबूच्या बिया शिजवून देखील खाल्ल्या जातात.

भारतात बासरी तसेच जावं इंडोनेशिया येथे बासरी झायलो फोन सारखे वाद्य बनवण्यासाठी बांबूचा वापर केला जातो जपानमध्ये बांबूचा उपयोग नावाप्रमाणे करतात तर शोभेसाठी उंचीचा बांबू कुंडीत लावतात त्याची हिरवी व दाट पाणे सुंदर दिसतात. चीन आणि जपान या देशात 3.3.5 मीटर उंचीचे सेंटर पर्यंत संस्कृतीचे दाचे बांबूचे पीक घेतले जाते. चीनमध्ये बाबूच्या पानांचा काढा अतिसार हगवण यावर देतात. भारतामध्ये अनेक भागात बांबूच्या कोवळ्या भागांचा उपयोग श्वसन विकारासाठी करतात.

शेतीसाठी असाही फायदा

साधारणत चार वर्ष बांबूच्या शेतीला लागतात. चौथ्या वर्षापासून बांबूची तोडणी सुरू होते. बांबूची लागवड दोन झाडांमध्ये तीन, चार मीटर अंतरावर केली जाते. या अंतरात आपण दुसरे घेऊ शकतो.

बांबू शेतीचे इतर फायदे

बांबूची पाने गुरांना चारा म्हणून खायला दिली जातात. त्यामुळे पर्यावरणाचे ही रक्षण होते. माती संवर्धनाचे महत्त्वाचे काम बांबू शेती करते. तसेच घरासाठी लागणाऱ्या फर्निचरसाठी जी वृक्षतोड केली जाते त्याला आळा घालता येतो.

बांबूचा या आजारावर होतो उपयोग

बांबूमुळे कफ रोगातील त्वचेचा दाह कमी होतो. कफातून रक्त पडत असल्यास ते बंद होते.

बांबूच्या कोवळ्या कोंबाचा आणि कोवळ्या पानांचा काढा गर्भाशयाचे संकोचन होण्यासाठी बाळंतपणात देतात.

बांबूच्या कोंबापासून बनविलेले पोटिस, व्रणातील किडे काढण्यासाठी वापरतात.

बांबूचे कोवळे कोंब कुठून सांधे सुजित बांधतात.

हेही वाचा- 'संभाजीराजेंनी आंदोलनात चालढकल करू नये'

बांबूच्या भाजीचे औषधी गुणधर्म

बांबू ही खूपच तंतुमय वनस्पती आहे. शिवाय ती क्षारयुक्तही आहे. यामुळे या भाजीतील तंतू व क्षार शरीराला मिळतात. बांबूच्या कोवळ्या खोडांच्या कोंबाची भाजी करतात. अगदी मांसल, मऊ कोंब भाजीसाठी वापरतात. बाळंतपणात नाळ पडून गेल्यानंतर गर्भाशयाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात. तसेच स्त्रियांचा विटाळ साफ होत नसल्यास ही भाजी गर्भोत्तेजक म्हणून देतात. यामुळे मासिक पाळीतील अडचणी दूर होतात.

बांबूपासून कापडाची निर्मिती

बांबूपासून आता कापडाची निर्मितीचे संशोधन ही केले जात आहे. अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म या कापडामध्ये असल्यामुळे त्वचेच्या आजारासाठी हे कापड उपयुक्त ठरते. त्याच बरोबर  सूर्यकिरणांपासून अल्ट्रा व्हायलेट किरणापासून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करते. आपल्या शरीरातील घाम योग्य प्रकारे शोषून घेऊन तो बाहेर टाकण्यासाठी सुद्धा या कापडाचा उपयोग परिणामकारक रित्या दिसून आला त्यामुळे हे कापड स्पोर्ट्स वेअर मध्ये अधिक फायदेशीर ठरणारे आहे.

असे हे बहुगुणी आणि बहुपयोगी बांबू वरदान ठरत आहे.त्याचबरोबर आर्थिक उत्पन्नाचा स्तोत्र ही या माध्यमातून चांगला उपलब्ध झाला आहे.