महामार्ग चौपदरीकरणासाठी मविआ चे आंदोलन ,मात्र आंदोलकांपेक्षा पोलिसच जास्त

ठेकेदारावर कारवाईची मिळाली हमी, मंत्री गडकरी यांच्या आश्वासनपत्राचे वाचन
chiplun
chiplun sakla
Updated on

चिपळूण : जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण रखडल्याप्रकरणी गुरुवारी (ता. २७) महाविकास आघाडीच्या वतीने महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. ठेकेदारासह केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंत्यांनी ३१ जानेवारीपूर्वी काम सुरू करण्याचे तसेच ठेकेदारावर कारवाई करण्याची हमी दिल्यानंतर पाऊण तासात उपोषण स्थगित करण्यात आले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण ते राजापूर दरम्यानचे चौपदरीकरण रखडलेले आहे. गेल्या पाच वर्षात वारंवार बैठका, निवेदने आणि आंदोलनाचे इशारे देऊनही चौपदरीकरणाच्या कामास चालना मिळत नसल्याचे महाविकास आघाडीच्या वतीने महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. चिपळुणात खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण आणि काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव आदी तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पॉवर हाऊस येथे सव्वाअकराच्या सुमारास रास्ता रोखोला सुरवात झाली. चिपळूण शहर व तालुक्यात महाविकास आघाडीची ताकद भक्कम आहे; मात्र आंदोलनाच्या ठिकाणी ही ताकद दिसली नाही. महाविकास आघाडीचे पदाधिकारी ठेकेदार कंपनी आणि केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत होते. निषेधाचे फलकही हाती घेऊन ठेकेदाराचा धिक्कार करीत होते.

chiplun
सिंधुदुर्गनगरीसाठी ‘डीपीडीसी’चा १८० कोटींचा आराखडा मंजूर; उदय सामंत

आंदोलन सुरू होताच अर्ध्या तासात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत व राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. या वेळी सामंत म्हणाले, खासदार राऊत यांनी पुकारलेल्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली. मंत्री गडकरी हे या महामार्गाच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील आहेत; मात्र ठेकेदारांच्या गलथान कारभारामुळे चौपरीकरणाचे काम रखडलेले आहे. राज्यातील आघाडी सरकारही या कामाचा पाठपुरावा करीत आहे.ठेकेदारावर कारवाई करतानाच नव्याने ठेकेदारांची नियुक्ती केली जात आहे. त्याचबरोबर थांबलेली कामे ३१ जानेवारीपूर्वी कोणत्याही स्थितीत केली जातील. तशी लेखी हमी मंत्री गडकरी यांनी दिलेली आहे. या आश्वासनपत्राचे वाचन आंदोलनस्थळी खासदार राऊतांनी केले.

chiplun
अहमदनगर जिल्हा वार्षिक नियोजनासाठी 510 कोटींचा आराखडा मंजूर

आंदोलकांपेक्षा पोलिस जास्त

आंदोलन जोरदार होण्याची महाविकास आघाडीच्या दोन-दोन बैठका झाल्या होत्या. शहरासह तालुक्यात महाविकास आघाडीचीच ताकद आहे. असे असतानाही आंदोलनाठिकाणी आघाडीची ताकद दिसली नाही. गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते कडेला राहून सावध भूमिका घेत होते. कायदा व सुवस्था अबाधित राखण्यासाठी सुमारे १३० पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. आंदोलन शांततेत झाले; मात्र आंदोलकापेक्षा पोलिसांचीच जास्त गर्दी असल्याची चर्चा घटनास्थाळी होती.

chiplun
दाभोळ : आरक्षण जाहीर; दापोलीला महिला नगराध्यक्ष

एक नजर..

  1. पॉवर हाऊस येथून रास्ता रोखोला सुरूवात

  2. सरकार विरोधात केली घोषणाबाजी

  3. निषेध फलकही घेऊन ठेकेदाराचा धिक्कार

  4. मंत्री उदय सामंत घटनास्थळी; दिली कामाबाबत माहिती

  5. खासदार राऊत यांनी पुकारलेल्या आंदोलनाची दखल

  6. मंत्री गडकरी हे या महामार्गाच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील

  7. ठेकेदारावर कारवाई; नव्याने ठेकेदारांची होणार नियुक्ती

  8. मंत्री गडकरी यांची लेखी हमी; झाले आश्वासनपत्राचे वाचन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dhamanse Hatwadi Bridge Ratnagiri
Why is Panval Waterfall closed in Ratnagiri?
Shaktipeeth Highway latest update
Raigad Viral Video
Marathi News Esakal
www.esakal.com