सिंधुदुर्गनगरीसाठी ‘डीपीडीसी’चा १८० कोटींचा आराखडा मंजूर; उदय सामंत

निधीत १० कोटींची वाढ; अखर्चित ४६ कोटी सिंधुरत्नमधून मिळणार
uday samant
uday samantsakal

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजनचा २०२२-२३ वार्षिक आराखड्यासाठी १८० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत १० कोटींची वाढ झाली. जिल्हा परिषदेकडील शासनात परत गेलेला अखर्चित ४६ कोटींचा निधी सिंधुरत्न योजनेतून पुन्हा जिल्ह्याच्या विकासासाठी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

uday samant
दाभोळ : आरक्षण जाहीर; दापोलीला महिला नगराध्यक्ष

प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजरोहनानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री सामंत म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा २६२ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूरीसाठी शासनाला सादर करण्यात आला होता. त्यापैकी १८० कोटींना शासनाने मंजुरी दिली आहे. गतवर्षी १७० कोटींचा आराखडा मंजूर झाला होता. त्या तुलनेत या मंजूर आराखड्यात १० कोटीची वाढ झाली आहे. जिल्हा नियोजनसाठी मंजूर झालेला १८० कोटींचा निधी जिल्ह्यातील विविध विकास कामांवर १०० टक्के खर्च करून जिल्ह्याचा विकास साधला जाईल."

ते म्हणाले, "जिल्ह्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने शासनाकडून मंजूर झालेल्या २५ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला येणे बाकी आहे. सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत झाल्यास हा निधी मिळणार नाही. विकास थांबणार आहे. त्यामुळे तूर्तास नगरपंचायतीचा प्रस्ताव थांबविण्यात आला आहे; मात्र २५ कोटी रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार असून या निधीतील कामे पूर्ण होताचपुन्हा नगरपंचायतीच्या प्रस्ताव मार्गी लावून नगरपंचायत स्थापन केली जाणार आहे."

uday samant
ठाणे जिल्हा परिषदेवर येणार महिला राज; आरक्षण सोडत जाहीर

ते म्हणाले, "उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता आपण त्यांच्याशी अनेक विकासकामांवर चर्चा केली. निधीबाबत चर्चा केली, यावेळी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजनचा अखर्चित ४६ कोटी रुपयांचा निधी परस्पर शासनाला पाठवून दिला होता. त्यामुळे अनेक विकासकामांवर त्याचा परिणाम झाला; मात्र हा ४६ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला परत मिळावा, याकडे आपण उपमुख्यमंत्री पवार यांचे लक्ष वेधले होते. त्यांनीही आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तो ४६ कोटी रुपयांचा निधी सिंधुरत्न योजनेमधून देण्याचे मान्य केले आहे."

महाविद्यालय अडकले श्रेयवादात

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यास कोणत्या अडचणी येत आहेत याबाबत पालकमंत्र्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, प्रशासनाकडून मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी सर्व बाबींची पूर्तता केली आहे; मात्र नेमके अडले कोठे? हे अद्याप कळत नाही; मात्र काहींनी हे कॉलेज श्रेयवाद लुटण्यासाठी अडकवून ठेवल्याचे बोलले जात आहे. मेडिकल कॉलेजचे श्रेय कोणीही घ्यावे, त्याला आपला विरोध नाही; मात्र हे कॉलेज पूर्ण होणे महत्त्वाचे आहे.

uday samant
Konkan Rain Update: चिपळूण, दापोलीला सतर्कतेचा इशारा

कुडाळात महाविकासची सत्ता येईल

कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीच्या सत्तेसाठी मंत्री सतेज पाटील यांच्याबरोबर चर्चा झाल्याचे सांमंत यांनी सांगितले. नगरपंचायतमधील काँग्रेसच्या नगरसेवकांनीही आपले मंत्री जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बहुमत महाविकास आघाडीकडे असल्याने या नगरपंचायतीवर आघाडीची सत्ता स्थापन होणार असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

घाटदुरुस्तीचे श्रेय सतीश सावंतांकडे

करुळ घाट दुरुस्त व्हावा, जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्या घाटाचा लाभ व्हावा, यासाठी सतीश सावंत यांनी खूप पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मंजूर होऊन त्याचे टेंडर निघाले आहे. टेंडर निघाले असल्याची माहिती मिळताच विरोधकांनी आमच्या पक्षाने हे काम केले असल्याचे दाखविण्यासाठी आणि श्रेय लाटण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले. मात्र, रस्त्याच्या दुरुस्तीचे श्रेय सावंत यांचे असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com