esakal | Malvan: परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलर्सची पुन्हा घुसखोरी
sakal

बोलून बातमी शोधा

परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलर्सची पुन्हा घुसखोरी

मालवण : परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलर्सची पुन्हा घुसखोरी

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर

मालवण : बदलत्या वातावरणाचा सामना करत मासेमारीस सज्ज झालेल्या मच्छीमारांच्या जाळ्यातील घास हिसकावून घेण्यासाठी पुन्हा परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलर्सनी घुसखोरी करण्यास सुरवात केली आहे. आज येथील समुद्रात आठ ते नऊ वाजायच्या आत परप्रांतीय ट्रॉलर्सनी घुसखोरी केल्याचे दिसून आले.

त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाने तत्काळ गस्तीनौका कार्यान्वित करून कारवाई करणे गरजेचे बनले आहे. अन्यथा या हंगामातही मच्छीमारांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात परप्रांतीय पर्ससीन आणि हायस्पीड नौका धुमाकूळ घालून येथील मत्स्यसंपदा ओरबाडून नेतात. मात्र मत्स्यव्यवसाय खात्याला लागलेले हप्तेबाजीचे ग्रहण आणि या बोटींवर कारवाई करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे येथील समुद्रात घुसखोरी करणाऱ्या परप्रांतीय नौकांवर ठोस कारवाई होताना दिसत नाही.

हेही वाचा: सांगली : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा पेच कायम

त्यामुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. दरम्यान, आज येथील रॉकगार्डन नजीकच्या समुद्रात १०० हून अधिक परप्रांतीय पर्ससीन नौका निदर्शनास आल्या आहेत. किनारपट्टी वरून या नौका सहजपणे दिसत असतानाही मत्स्यव्यवसाय विभागाचे येथे दुर्लक्ष होत आहे. तरी मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने गस्तीनौका पाठवून या नौकांवर कारवाई करावी, अशी मागणी मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी केली आहे.

loading image
go to top