

The programme aimed to mark Ajit Pawar's birth anniversary through visits to institutions where no formal celebration had been planned.
Sakal
पाली : राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विकासात्मक योगदानाचा गौरव करत राज्य सरकारने त्यांची जयंती अधिकृतपणे साजरी करण्याचे आदेश दिले होते. शासकीय आदेशाचा आदर राखत आणि अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ग्रामसेवक संघटना सुधागडचे अध्यक्ष मयुर कारखानीस यांनी एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवला. ज्या ठिकाणी जयंतीचे नियोजन झाले नव्हते, अशा शासकीय प्रशासकीय कार्यालयांमध्ये व शैक्षणिक संस्थांमध्ये मयुर कारखानीस यांनी स्वतः भेट देऊन अजितदादा पवार यांची प्रतिमा आणि पुष्पहार भेट दिले.