esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

शाब्बास! कोकणचा 'मयुरेश' भारतीय क्रिकेट संघात

महाराष्ट्रातील आठ जणांचा समावेश असून सिंधुदुर्गातील दोघे आहेत.

शाब्बास! कोकणचा 'मयुरेश' भारतीय क्रिकेट संघात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : माजगाव येथील सुपुत्र मयुरेश मेस्त्री याची १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली. उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

हेही वाचा: निमंत्रण आले तरच दसऱ्या मेळाव्याला जाईन; अनंत गीते

आग्रा येथे झालेल्या टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तर प्रदेश व टेनिसबॉल क्रिकेट फेडरशन ऑफ इंडिया, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या स्पर्धेत या १९ वर्षांखालील भारतीय टेनिसबॉल क्रिकेट टीमची निवड करण्यात आली. या स्पर्धेत मेस्त्री याने पाच सामन्यांत भेदक व अचूक टप्प्यावर गोलंदाजी करीत पाच सामन्यांत १३ गडी बाद केले होते. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. या राष्ट्रीय स्पर्धेतून देशातील एकूण १४ जणांचा समावेश असलेली १९ वर्षांखालील भारताची टीम निवडण्यात आली.

यात महाराष्ट्रातील आठ जणांचा समावेश असून सिंधुदुर्गातील दोघे आहेत. या संघाचा कर्णधार सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच असल्याने आणि भेदक गोलंदाजीमुळे प्रत्यक्ष मैदानावरील अंतिम ११ जणांत मयुरेश मेस्त्रीची निश्चित मानली जात आहे. मयुरेश मेस्त्री याचवर्षी तामिळनाडूत कन्याकुमारी येथे झालेल्या नॅशनल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राच्या टीममधुन खेळला होता. या स्पर्धेतही त्याने चमकदार कामगिरी केली होती. मयुरेश मेस्त्रीला रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव तथा टेनिस बॉल क्रिकेट प्रशिक्षक प्रकाश तांबिटकर (रत्नागिरी) यांचे मार्गदर्शन लाभले. मयुरेशच्या घरची परिस्थिती गरीबीची आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन त्याने संघात स्थान मिळवले आहे.

हेही वाचा: जुने वाहन खरेदी करताय? फक्त 'NOC' नको, मूळ टॅक्‍स पावती घ्या, अन्यथा...

loading image
go to top