सध्या पॅसिफिक व्हाईट कोळंबीचे उत्पादन घेत आहे. त्याला व्हेनामी कोळंबी म्हणतात. सध्या तरी माझे उत्पादन हे बाहेरील देशात न जाता भारतातच विक्री होत आहे.
दापोली : वाणिज्य शाखेतून एमबीएचे शिक्षण (MBA Education) घेत वडिलोपार्जित कोळंबी प्रकल्पामधून (Shrimp Project) आंबवली बुद्रुक येथील हृषिकेश केळकर हा तरुण दरवर्षी हेक्टरी अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळवत आहे. शिक्षणासोबत या प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या संकल्पना राबवून उत्पन्न वाढवण्याचा हृषिकेशचा मानस आहे.