'खासदारांसह दोन्ही आमदारांमुळेच मेडिकल कॉलेज'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

मंजूरी मिळण्यापूर्वी दोन दिवस खासदार राऊत व आमदार नाईक यांनी अहोरात्र मेहनत घेतली.

ओरोस (रत्नागिरी) : जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर होण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांचे मोठे श्रेय आहे. मंजूरी मिळण्यापूर्वी दोन दिवस खासदार राऊत व आमदार नाईक यांनी अहोरात्र मेहनत घेतली. आमदार नाईक यांनी तर रायगड जिल्ह्यात मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेजच्या फाईलमधील पत्र आणून अधिकाऱ्यांना रायगड जिल्ह्यात मंजूर होते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात का होत नाही? असा प्रश्‍न केला. त्यामुळे हे मेडिकल कॉलेज मंजूर होवू शकले, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यानी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा - तरीही ती घाबरली नाही ; नवव्या महिन्यात १२ वाड्यांमध्ये दिली आरोग्य सेवा

यावेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, 'जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे, ही गेल्या 30 वर्षांपासुनची मागणी होती, मात्र कोणी लक्ष दिले नाही. काहींना वेळ मिळाला नाही; परंतु जिल्ह्यातील शिवसेना खासदार व आमदार यांच्या समन्वयातून ते शक्‍य झाले आहे. माझा यात खारीचा वाटा आहे. कोणाला श्रेय घ्यायचे असेल तर घेवू दे, मला त्याचे वाईट वाटणार नाही. याबाबत आदेश काढताना 3 वर्षांत मेडिकल कॉलेजसाठी आवश्‍यक सुविधा उभारण्याचे नमूद केले आहे. तोपर्यंत जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज सुरु होईल.'

हेही वाचा -  मच्छीमारांच्या समस्येत पावसाळी वातावरणाची भर -

खासदार नारायण राणे यांनी जिल्हा नियोजन निधितील मंजूर कामांची यादी बदलून विरोधी पक्षाची कामे कमी केल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना मंत्री सामंत यांनी, याबाबत खासदार राणे यांची कामे असल्यास पत्र द्यायला सांगा, असे जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे. निधी कमी आला आहे. त्यामुळे कामे कमी केलेली आहेत, मात्र केवळ एकाच मतदार संघातील कामे कमी केलेली नाहीत. तिन्ही मतदार संघातील कामे कमी केली असल्याचे सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: medical college demands helping two MLA contribution also counted in ratnagiri said uday samant