कुडा वनस्पती दोन प्रकारची आहे. पांढरा कुडा आणि तांबडा कुडा. कोकणातील ग्रामीण डोंगराळ भागात तांबड्या फुलांचा कुडा तुरळक तर मोठ्या प्रमाणात पांढऱ्या फुलांचा कुडा आढळून येतो.
म्हापण : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील डोंगराळ परिसरात मोठ्या प्रमाणात आढळणारी औषधी ‘कुडा’ वनस्पती (Kuda Plant) जंगलतोडीमुळे व बागायतीसाठी केल्या जाणाऱ्या जमीन सपाटीकरणामुळे नष्ट होण्याची भीती वनस्पती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. डोंगर भागातील रहिवासी पूर्वी कुड्याच्या फुलांची विक्री करून आपली उपजीविका करीत असतो; परंतु आता ही वनस्पती जंगलातून हळूहळू दिसेनासी होऊ लागली आहे.