
पाली : रायगड जिल्ह्यात कोणत्याही आपत्तीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून हजारो जीव वाचवणारा, शेकडो युवकांना प्रशिक्षण देणारा, आणि हजारोंना प्रेरणा देणारा एक धाडसी आणि समर्पित जीवरक्षक तरुण म्हणजे सागर दहिंबेकर. अपार धैर्य आणि कसून घेतलेल्या प्रशिक्षणाच्या जोरावर अवघ्या 26 वर्षांचा हा तरुण आपत्ती व्यवस्थापन आणि रेस्क्यू क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देत आहे.