esakal | साखरप्यात आजपासून कडक लॉकडाउन; महिना अखेरपर्यंत कडकडीत बंद

बोलून बातमी शोधा

साखरप्यात आजपासून कडक लॉकडाउन; महिना अखेरपर्यंत कडकडीत बंद

साखरप्यात आजपासून कडक लॉकडाउन; महिना अखेरपर्यंत कडकडीत बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साखरपा : साखरपा परिसरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महिना अखेर पर्यंत कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल सायंकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पाडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी सायंकाळी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत साखरपा गावात ३० तारखेपर्यंत कडक लॉकडाउन पाळण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. ह्या लॉकडाऊन औषध दुकाने वगळता अत्यावश्यक सेवाही बंद रहाणार आहेत. ह्या लॉकडाउनदरम्यान किराणा व्यापारी आणि भाजी विक्रेते यांना केवळ घरपोच सेवा देण्यास मुभा देण्यात आली आहे. याशिवाय अन्य महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

गावातील खाजगी डॉक्टर तापाचे रुग्ण तपासणार नाहीत तर असे रुग्ण सरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात येणार आहेत. लोक सध्या ताप अंगावर काढत आहेत. डॉक्टरकडे गेल्यावर त्याने कोरोना चाचणी सांगितल्यास दुसर्‍या डॉक्टरकडे लोक जातात. परिणामी वेळ जावून रोग बळावत असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यापुढे डॉक्टरांच्या सूचनेशिवाय कोणालाही औषध दुकानातून तापाची औषधे मिळणार नाहीत. गावात जिल्ह्याबाहेरून येणार्‍या कोणत्याही वाहनास प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या बैठकीला सरपंच बापू शेटये, पंचायत समिती सभापती जयसिंग माने, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पी बी आदाते, परिसरातील खाजगी डॉक्टर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर आदी उपस्थित होते.

  • ३० तारखेपर्यंत कडक लॉकडाउन

  • खाजगी डॉक्टर तापाचे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वर्ग करणार

  • डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध दुकानातून तापाची औषधे बंद

  • जिल्हया बाहेरील वाहनांना गावात प्रवेश नाही