वैश्‍यवाणी जात प्रमाणपत्रासाठी सोमवारी मुंबईत बैठक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

सावंतवाडी - वैश्‍यवाणी समाजाच्या जात प्रमाणपत्रासाठी 29 ला कामगार व ओबीसी मंत्री डॉ. संजय कुंटे यांची बैठक मुंबई येथे आयोजित केली असल्याची माहिती भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी दिली.

सावंतवाडी - वैश्‍यवाणी समाजाच्या जात प्रमाणपत्रासाठी 29 ला कामगार व ओबीसी मंत्री डॉ. संजय कुंटे यांची बैठक मुंबई येथे आयोजित केली असल्याची माहिती भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी दिली.

मंत्री डॉ. संजय कुंटे यांची भेट राजन तेली यांच्या शिष्टमंडळाने घेतली. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग, नगरसेवक आनंद नेवगी, दादू कविटकर, प्रथमेश तेली तसेच पदाधिकारी उपस्थित होते. वैश्‍य समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणीबाबत मंत्र्याचे राजन तेली यांनी लक्ष वेधले.

याबाबत एक बैठक आयोजित करावी, अशी श्री. तेली यांनी मागणी केली. मंत्री डॉ. संजय कुटे यांनी येत्या सोमवारी वैश्‍य समाज जात प्रमाणपत्रबाबत बैठक निश्‍चित केली असल्याची माहिती राजन तेली यांनी दिली. या बैठकीत वैश्‍य समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्‍न निकाली लावण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. यावेळी वैश्‍य समाज शिष्टमंडळासह जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार या बैठकीत उपस्थित राहतील, असे राजन तेली यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting on Monday for Vaishyawani caste certificate