"खेळ पैठणी' स्पर्धेत मेघा दुबळे प्रथम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

जगन्नाथराव भोसले उद्यानात "घे भरारी' फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त "खेळ पैठणी'चा कार्यक्रम घेण्यात आला. ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्रणाली गोडघाटे आणि स्वाभिमान माजी जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे आदी उपस्थित होत्या.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात "घे भरारी' फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त "खेळ पैठणी'चा कार्यक्रम घेण्यात आला. ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्रणाली गोडघाटे आणि स्वाभिमान माजी जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे आदी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात खेळ पैठणीचा ची पूर्ण धुरा कपिल कांबळे यांनी हाताळून अनेक प्रकारचे मनोरंजक खेळ त्यांनी यावेळी घेत उपस्थितांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमातील बक्षिस म्हणून देण्यात येणाऱ्या पैठणीच्या प्रायोजक राष्ट्रवादी विधानसभा मतदार संघाच्या पक्ष निरीक्षका अर्चना घारे परब यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या विजेते मेघा दुबळे यांना पैठणीचे वितरण करण्यात आले. 

यावेळी घेण्यात आलेल्या मनोरंजक खेळातून महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत विविध पारितोषिके पटकाविली. पावर लिफ्टिंगमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेल्या पूर्वा मळीक, धनश्री कवठणकर, प्रसन्न परब, हर्षदा ठाकर आकांक्षा पवार यांचा "घे भरारी'तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन घे भरारी खजिनदार आदित्य नाईक यांनी केले. तर आभार सरिता फडणस यांनी मानले. घे भरारीमध्ये नवीन सदस्यांचा प्रवेश झाला त्यांचे स्वागत घे भरारीच्या अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी केले. याला मंडळाचे उपाध्यक्ष रिया रेडिज, सेक्रेटरी पल्लवी रेगे, शारदा गुरव, वंदना मडगावकर, सुरेखा रायका, गीता सावंत देवता हावळ, चित्रा भिसे स्नेहल काळविंदे या सर्वांचे सहकार्य लाभले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Megha Dubale First In Khel Paithani Competition Sindhudurg Marathi News