नगरसेवक परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी `यांची` निवड

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

राज्यातील सर्व नगरसेवकांचा एकमेकांशी परिचय व्हावा. त्या त्या भागातील प्रश्‍नांना राज्य पातळीवर वाचा फोडता यावी तसेच शहरांच्या विकासाला चालना मिळावी या अनुषंगाने नगरसेवक परिषद या संघटनेची स्थापना झाली आहे.

कणकवली  ( सिंधुदुर्ग ) - नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षपदी मेघा गांगण यांची निवड झाली. सौ गांगण या कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका आहेत. नगरसेवक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे आणि प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे-पाटील यांनी गांगण यांना नियुक्‍तीचे पत्र दिले. 

राज्यातील सर्व नगरसेवकांचा एकमेकांशी परिचय व्हावा. त्या त्या भागातील प्रश्‍नांना राज्य पातळीवर वाचा फोडता यावी तसेच शहरांच्या विकासाला चालना मिळावी या अनुषंगाने नगरसेवक परिषद या संघटनेची स्थापना झाली आहे.

या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गांगण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. गांगण या बारा वर्षांपासून कणकवली नगरपंचायमध्ये निवडून येत आहेत. 2008 मध्ये पहिल्यांदा त्या नगरसेवकपदी निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी शहराध्यक्ष नगराध्यक्षपद, तसेच महिला व बालकल्याण सभापतीपद भूषविले. सध्या त्या जिजाई अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष, साज ग्रुप महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षपद सांभाळत असताना महिला सबलीकरणासाठी काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी रोटरी क्‍लबच्या माध्यमातून विविध सामाजिक, आरोग्यविषयक राबवले होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Megha Gangan Corp orator Conference Sindhudurg District President