esakal | राम मंदिर भूमिपुजन सोहळ्यावर 'त्या' कारसेवकाच्या अशा आहेत भावना ...
sakal

बोलून बातमी शोधा

memories for 1992 babri masjid collapse movement

इतिहासकालीन धर्मीवर पाय ठेवून कारसेवा करण्याची संधी आम्हांला तेव्हा मिळाली

राम मंदिर भूमिपुजन सोहळ्यावर 'त्या' कारसेवकाच्या अशा आहेत भावना ...

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण : बाबरची निशाणी नष्ट करून तेथे रामाचे मंदिर बांधायचे स्वप्न पूर्ण होत आहे. संपूर्ण देशवासीयांची इच्छा यानिमित्ताने पूर्ण होत आहे. यासाठी अनेक संत, महंत आणि रामभक्त कारसेवकांनी अपार कष्ट घेतले आहेत. माझ्या जीवनातील हा परमोच्च क्षण आहे. अशी प्रतिक्रिया 1992 च्या कारसेवेत सहभागी झालेले रामभक्त प्रसाद आगवेकर यांनी ‘सकाळ’ला दिली. 

हेही वाचा - दैव बलवत्तर! मांजरामुळे वाचले प्राण, घटना अंगावर शहारे आणणारी...

आयोध्येत 1992 मध्ये राममंदिर उभारणीसाठी कारसेवा झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हजारो कारसेवक तेव्हा आयोध्येत गेले होते. त्यामध्ये चिपळूणातील प्रसाद आगवेकरही सहभागी झाले होते. ते म्हणाले, संघाच्या कामानिमित्त 1992 मध्ये मी सिंधुदुर्गमध्ये होतो. कारसेवेसाठी जाण्याचा निर्णय झाल्यानंतर माझ्यासह दोन्ही जिल्ह्यातून हजारो कारसेवक आयोध्येत गेले. आम्ही तीन दिवस आयोध्येत होतो. इतिहासकालीन धर्मीवर पाय ठेवून कारसेवा करण्याची संधी आम्हांला तेव्हा मिळाली. हे माझे भाग्यच होते. आम्ही रेल्वेने एकूण दहा दिवसाचा प्रवास केला. विश्‍वहिंदू परिषद, आरएसएस आणि इतर सहयोगी संस्थांचे कार्यकर्ते आमच्यासोबत होते. आयोध्येत आम्हांला प्रवेश मिळाला. तेथे निवासासाठी आणि जेवणाची व्यवस्था झाली. 

1992 ची कारसेवा राममंदिर उभारणीच्या दृष्टीने निर्णायक ठरली. 1989 मध्ये मुलायमसिंह यांचे सरकार असताना दुसरी कारसेवा झाली. तेव्हा आयोध्येत सहज प्रवेश मिळत नव्हता. अनेकांवर लाठीचार्ज झाला. काहींचे जीव गेले. त्यांचे मृतदेह नदीत फेकून देण्यात आले होते. आज त्यांचे बळीदान सार्थकी ठरले. प्रभू रामाचे आयोध्येतील मंदिर हे जगात आदर्श ठरावे. मंदिराची उभारणी सामंजस्य व मानवतेची उभारणी आहे. 

हेही वाचा -  रत्नागिरीत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात कोरोनाचा शिरकाव , पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना लागण... 

सर्वांनी मठ, मंदिरात आणि आपल्या घरासमोर रांगोळ्या काढाव्या. सर्व रामभक्तांनी आपल्या घरी सामूहिक बैठक करून सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत आपल्या आराध्य देवाचे भजन-पूजन, कीर्तन स्मरण करावे, पुष्प समर्पित करावे, आरती करावी व प्रसाद वाटावा. भूमीपूजनाचा कार्यक्रम लाईव्ह पाहावा. आपल्या घरी, सोसायटी, गाव तसेच बाजारात यथा शक्ती सजावट करावी. सायंकाळी सूर्यास्तानंतर दीपोत्सव साजरा करावा. आपल्या समर्थानुसार अयोध्येतील 'श्री राम मंदिर' निर्माण कार्यासाठी यथाशक्ति दानाचा संकल्प करावा. तसेच सरकार आणि प्रशासनाद्वारे दिल्या गेलेल्या दिशा-निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन आगवेकर यांनी केले.

संपादन - स्नेहल कदम 


 

loading image