
IMD Alert Sindhudurg : गेल्या दोन-तीन दिवसांपासून कमी झालेल्या पावसाचा जोर आज पहाटेपासून काहीसा पुन्हा वाढला आहे. पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. समुद्र खवळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, प्रत्यक्षात लाटांचा जोर फारसा नव्हता.