'पाच' जिल्ह्यांसाठी हवामानाचा अलर्ट; निवळी घाटात वाहतूक ठप्प

'पाच' जिल्ह्यांसाठी हवामानाचा अलर्ट; निवळी घाटात वाहतूक ठप्प

रत्नागिरी: कोकणात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून राज्यातील इतर विविध जिल्ह्यांमध्येही पाऊस पडत आहे. कालपासून जोर धरलेला पाऊस अजून पुढील २-३ दिवस राहील व या दिवसांत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह ठाण्यातही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे परिसरासह कोकणात हवामान विभागानं येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याबाबत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी काल सायंकाळी ट्विट करून मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दर्शक माहिती दिली आहे.हवामान विभागानं जाहीर केलेल्या अलर्टनुसार मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील जगबुडी, नारंगी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जगबुडीची इशारा पातळी ६ मीटर आहे. सध्या जगबुडी नदीची पाणीपातळी ६.७५ मीटर एवढी आहे. त्यामुळे प्रशासनही सतर्क झालं आहे. तसेच गेले २ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील खाडी पट्ट्यातील गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर नारंगी नदीच्या पुराचं पाणी आलं आहे. बहीरवली, सुसेरी यासह खाडीपट्टयातील १५ गावाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प आहे.

रस्त्यावर माती येऊन निवळी घाटात वाहतूक ठप्प

डोंगराची माती रस्त्यावर आल्याने काल रात्री 2 च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सध्या या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू आहे. वाहतूक ठप्प झाल्यावर दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अडकलेल्या ट्रेकचालकांनी रस्त्यावरील थोडी माती बाजूला करीत रुग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा केला. मात्र या ठिकाणाहून मोठी वाहने पुढे जात नव्हती. आज सकाळी ही माती हटवण्यात आली असून आता मार्ग सुरळीत सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com