

Army Recruitment Dream Remains Unfulfilled As Hari Dies Friends Break Down At Funeral And Villagers Pay Emotional Tribute
sakal
विसापूर: येथून जवळच असलेल्या हातनोली येथील प्रतीक ऊर्फ हरी सुरेश पाटील (वय २४) याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. गरीब, होतकरू, प्रचंड कष्ट करणाऱ्याचा मृत्यू गावकऱ्यांसह मित्रांना चटका लावणारा ठरला. त्याचे सैन्य भरतीचे स्वप्न अधुरेच राहिले. ‘हरी इतक्या लवकर तू जायला नको होतंस, ’ असं म्हणत स्मशानभूमीत मित्रांनी टाहो फोडला.