Ratnagiri : लाखो भाविकांनी केले गंगा स्नान

गंगामाईचे १६६ दिवसांनंतरही वास्तव्य कायम; पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिकांना मिळाला रोजगार
Ratnagiri  Millions devotees bathed GangesGangamai
Ratnagiri Millions devotees bathed GangesGangamai sakal

राजापूर : मे महिन्यामध्ये आगमन झालेल्या गंगामाईचे १६६ दिवसांनंतरही वास्तव्य कायम आहे. या कालावधीमध्ये गंगातीर्थक्षेत्राला राज्यासह परराज्यातील एक लाखाहून अधिक भाविकांनी भेट देऊन गंगास्नानाची पर्वणी साधली आहे.

सद्यस्थितीमध्ये मूळ गंगा, काशिकुंड, गायमुख आणि सर्व कुंडांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याची माहिती गंगा देवस्थानचे पदाधिकारी श्रीकांत घुगरे यांनी दिली. पावसाळ्यानंतर गंगातीर्थक्षेत्री पवित्र गंगास्नानासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली असली तरी

दिवाळी सुटीनिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यावर भटकंती करण्यासह विविध पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांची संख्या वाढली आहे. त्यातून पर्यटन फुले लागले असून, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची पाऊले गंगातीर्थक्षेत्राकडे वळतील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

शहरानजीकच्या उन्हाळे येथील तीर्थक्षेत्री गंगामाईचे होणारे आगमन आणि वास्तव्याचा काळ भाविकांच्यादृष्टीने एक धार्मिक पर्वणी असते. त्यामुळे गंगामाईच्या वास्तव्याच्या काळात विविध राज्यांतील भाविक या ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी येतात, मात्र कोरोनातील लॉकडाउनमुळे अनेक भाविकांनी गंगास्नानाची ही पर्वणी साधता आलेली नव्हती. अशा स्थितीमध्ये गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आलेल्या गंगामाईचे साधारण अडीच-तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये गंगामाईने निर्गमन झाले होते.

त्यानंतर ७५ दिवसांनंतर १५ मे रोजी पुन्हा एकदा गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. ही गंगा अजूनही प्रवाही आहे. मे महिन्यामध्ये गंगास्थानी आलेल्या भाविकांची संख्या जास्त होती. त्यानंतर पावसाळा, शेतीच्या कामामध्ये गुंतलेले शेतकरी आणि सुरू झालेल्या शाळा या साऱ्या स्थितीमध्ये गंगास्थानी येणाऱ्या भाविकांची संख्या घटली होती, मात्र दिवाळीमध्ये पुन्हा एकदा जिल्ह्यातील पर्यटन फुले लागले आहे. त्यातून जिल्ह्याच्या विविध पर्यटनस्थळांसह सागरी किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची पावले हळूहळू गंगास्नानाकडे वळली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com