"शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जादाची १३ एकर जमीन देण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी कौशल्य विकास विभागाकडील आयटीआयची तीन एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली."
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास (Sindhudurg Government Medical College) आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करा. वैद्यकीय महाविद्यालयातून गोवा येथे रुग्ण पाठवण्याची पद्धत (रेफर) ताबडतोब बंद करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले.