मराठा तरुणांच्या विश्वासघाताचा प्रश्नच नाही ः जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

महाविकास आघाडीने मराठा तरुणांचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाजाचे आरक्षण टिकावे यासाठी प्रयत्न सुरू आहेतच, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी सावर्डे येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

चिपळूण ( रत्नागिरी) - महाविकास आघाडीने मराठा तरुणांचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी, आम्ही प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी सावर्डे येथे केले. त्याचबरोबर माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षणाबाबत चोख प्रत्युत्तरही पाटील यांनी सावर्डे येथे दिले. 

राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हा प्रकार राज्य सरकारला निश्‍चितच महागात पडणार, असे ट्विट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीका केली.

याला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. घरात बसून चंद्रकांत पाटील यांनी ट्‌वीट करून काय भूमिका व्यक्त केली, यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची काही आवश्‍यकता आहे, असे वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीने मराठा तरुणांचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाजाचे आरक्षण टिकावे यासाठी प्रयत्न सुरू आहेतच, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी सावर्डे येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी आमदार शेखर निकम, बाबाजीराव जाधव आदी उपस्थित होते. 

संपादन - राजेंद्र घोरपडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Jayant Patil Answer On Chandrakant Patil Comment On Maratha Reservation