"मी पालकमंत्री झालो म्हणून काही जण गोव्यात जात आहेत. मालमत्ता विकत आहेत. पण, गोव्यातही मुख्यमंत्री भाजपचे प्रमोद सावंत आहेत हे लक्षात ठेवावे."
सावंतवाडी : लोकसभा व विधानसभा निवडणुकींमध्ये ज्या-ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले त्यांना यापुढील निवडणुकांमध्ये संधी दिली जाईल. पक्षाचे नेतृत्व हे प्रामाणिक कार्यकर्त्यांसोबतच राहील. येणाऱ्या काळात सावंतवाडी मतदारसंघातील गावागावांत भाजप पक्ष वाढविण्यासाठी काम करा. सावंतवाडी तालुक्याला नेहमीच जिल्ह्यात नंबर वन ठेवा. पालकमंत्री म्हणून सर्व ताकद द्यायला मी तयार आहे, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केला.