esakal | अपघाताने आमदार झाल्याचे भान ठेवा; रामदास कदम यांनी सुनावले
sakal

बोलून बातमी शोधा

अपघाताने आमदार झाल्याचे भान ठेवा; रामदास कदम यांनी सुनावले

खेड - तुम्ही कोण होतात, कोणी तुम्हाला पुढारी बनवले, अपघाताने झालेले आमदार. तुम्हाला लॉटरी लागली आहे याचे थोडे भान ठेवा, योगेश कदम स्वतः गावागावात फिरतात, लोकांची कामे करतात, तुमच्या आई-वडिलांनी हेच शिकवले का, मोठ्यांना एकेरी नावाने बोलून आपली उंची वाढते असे वाटत असेल, तर ते लोकांना कळते, जो तुमचा राजकीय बाप आहे, त्याला एकेरी नावाने बोलून तुमची उंची वाढत नाही तर कमी होते, अशा शब्दात रामदास कदम यांनी आमदार कदम यांना नाव न घेता सुनावले.

अपघाताने आमदार झाल्याचे भान ठेवा; रामदास कदम यांनी सुनावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड - तुम्ही कोण होतात, कोणी तुम्हाला पुढारी बनवले, अपघाताने झालेले आमदार. तुम्हाला लॉटरी लागली आहे याचे थोडे भान ठेवा, योगेश कदम स्वतः गावागावात फिरतात, लोकांची कामे करतात, तुमच्या आई-वडिलांनी हेच शिकवले का, मोठ्यांना एकेरी नावाने बोलून आपली उंची वाढते असे वाटत असेल, तर ते लोकांना कळते, जो तुमचा राजकीय बाप आहे, त्याला एकेरी नावाने बोलून तुमची उंची वाढत नाही तर कमी होते, अशा शब्दात रामदास कदम यांनी आमदार कदम यांना नाव न घेता सुनावले.

कदम आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या दौऱ्यात विकासकामांचे भूमिपूजन चालू असताना आमदार संजय कदम यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली. या प्रकारामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर वातावरण चांगलेच तापले आहे.

या पार्श्‍वभूमीवर रामदास कदम यांनी आमदार संजय कदम यांच्यावर आगपाखड केली. जामगे येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मी महाराष्ट्राचा नेता आहे, मंत्री आहे. गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पालकमंत्री आणि आपण स्वतः आल्यानंतर घोषणाबाजी करणे हे शोभनीय नाही. या घटनेचा आपण निषेध करतो.

गेल्या साडेचार वर्षात योगेश कदम यांनी विकासापासून वंचित राहिलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघात कामाला सुरवात केली आहे. मंत्रालयात जाऊन अनेक मंत्र्यांना भेटून आणि मलाही भेटून कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांसाठी निधी आणला. कित्येक वर्ष रखडलेली कामे त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लावली आहेत. हे सर्व पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

गुपचूप नारळ फोडण्याचे उद्योग
आपल्याकडून काहीच झाले नाही म्हणून दुसऱ्याने मंजूर करून आणलेल्या कित्येक कामांचे गुपचूप जाऊन नारळ फोडण्याचे उद्योग संजय कदम करीत आहेत. त्यामुळे हे फार दिवस चालणार नाही. ग्रामीण जनता सुज्ञ आहे.

loading image
go to top