esakal | राज्यमंत्री तटकरे ; रत्नागिरी व गुहागर तालुक्यात शासन राबवणार पायलट प्रोजेक्‍ट कोणता वाचा....
sakal

बोलून बातमी शोधा

Minister of State Aditi Tatkare press conference in dapoli ratnagir

दापोली, मंडणगडसाठी चांगला निर्णय होईल....

राज्यमंत्री तटकरे ; रत्नागिरी व गुहागर तालुक्यात शासन राबवणार पायलट प्रोजेक्‍ट कोणता वाचा....

sakal_logo
By
चंद्रशेखर जोशी

दाभोळ (रत्नागिरी) : निसर्ग चक्रीवादळात पर्यटन उद्योगाचेही प्रचंड नुकसान झाले असून त्यासाठी नव्याने पर्यटन धोरण ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दापोलीत पत्रकार परिषदेत दिली.पंचायत समिती दापोलीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, माजी आमदार संजय कदम, अजय बिरवटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रविवारी ( २६) त्या दापोली तालुका दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी आढावा बैठक घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. शासनाने निसर्ग चक्रीवादळात हानी झालेल्याना वाढीव आर्थिक मदत देऊ केली आहे. येथील बागांना दिली जाणाऱ्या मदतीत आता सुपारी व कोकम या फळझाडांचाही समावेश केल्याची माहिती त्यांनी दिली. कोकणात पर्यटन उद्योगाला चालना मिळावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे वादळाने बाधित असलेल्या दापोली-मंडणगड तालुक्‍याबाबतही चांगला निर्णय घेतील, असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- ...तर बळजबरीने जमिने घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू! कुणी दिलाय इशारा? -

पर्यटन महामंडळाच्या मालकी असलेल्या जागा लीजवर देण्यासाठी निर्णय घेण्यात येईल. पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल व पर्यटन उद्योग पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे उभा राहण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील. यासाठी येथील पर्यटन उद्योजकांजवळही आपण संवाद साधला आहे. त्यांनी त्यांच्या मागण्याचे निवेदन दिले आहे. 


येथील उद्योजकांना पुन्हा उभे राहता यावे, यासाठी प्रयत्न केले जातील. दापोली येथील तालुका क्रीडा संकुलाची एक इमारत वापराविना जुनी झाली आहे, तेथे क्रीडा साहित्य पडून आहे, हे प्रश्नही आढावा बैठकीत समोर आले. या सगळ्याचा अहवाल आठ दिवसात मागविला असून याबाबत शासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही होईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

रस्ता की खाचखळगे? वाहनचालक त्रस्त, आंदोलनाचा इशारा -

मुरुड, कर्दे...
 जिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटनस्थळे कोकणात व या जिल्ह्यात-तालुक्‍यात आहेत. त्यासाठी पायलट प्रोजेक्‍ट शासन राबवणार असून या माध्यमातून येथील मुरुड, कर्दे आदी महत्त्वाच्या ठिकाणी शॅक्‍ससारखा प्रोजेक्‍ट पुढील टप्प्यात राबविण्यात येईल. या प्रोजेक्‍टमध्ये प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरी व गुहागर तालुका घेतला आहे.

संपादन - अर्चना बनगे 
 

loading image