"त्या' 47 कामगारांना परत पाठवा : गृह राज्यमंत्री देसाई यांनी दिले आदेश का वाचा....

Minister of State for Home (Rural) Shambhuraj Shivajirao Desai has ordered the police to repatriate 47 unauthorized workers from a company
Minister of State for Home (Rural) Shambhuraj Shivajirao Desai has ordered the police to repatriate 47 unauthorized workers from a company
Updated on

रत्नागिरी : एका कंपनीमध्ये विनापरवानगी आलेल्या 47 कामगारांचा त्यांच्या राज्यात परत पाठविण्याचे आदेश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई यांनी पोलिस यंत्रणेला दिला. तसेच बाहेरुन आलेल्या व होम क्वारंटाईन झालेल्या नागरिकांवर बारीक नजर ठेवा, संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्धतेबाबत खबरदारी घ्या, ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी जास्त डॉक्‍टरांची नेमणूक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

होम क्वारंटाईन लोकांवर नजर ठेवा 


जिल्हाधिकारी सभागृह येथे कोव्हिड 19 प्रादुर्भाव व त्याअनुंषगाने केलेल्या उपाययोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. माने, जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते. आमदार राजन साळवी यांनी एका कंपनीत विनापरवानगी आलेल्या 47 कामगारांचा मुद्दा बैठकीत मांडला. या सर्वांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याच्या सूचना देसाई यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. 


हेही वाचा- शंभर दिवसात 32 बालकांची कोरोनावर मात: रत्नागिरी  जिल्हा कोव्हिड रुग्णालयाने केली अशी  दैदिप्यमान कामगिरी
 
औषधे, बेड आदींचा आढावा 
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांबाबत, रुग्णालयातील औषधांची उपलब्धता, अत्यावश्‍यकसाठी बेड, ऑक्‍सीजनचा पुरवठा आदी बाबतचा आढावा श्री. देसाई यांनी घेतला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com